वेळापूर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती साजरी…!
वेळापूर (बारामती झटका)
ये आझादी झुठी है, देश की जनता भुखी है…, अवघ्या विश्वाला ठासून सांगणारे थोर साहित्यिक, साहित्यसम्राट, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त वेळापूर एसटी स्टँड येथील अर्धकृती पुतळ्यास अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा. श्री. उत्तमराव जानकर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर ध्वजारोहण वैधकीय अधिकारी मा. श्री. डॉ. बी. बी. ओव्हाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच रजनिश बनसोडे, उपसरपंच तानाजी चव्हाण, वेळापूर पोलिस स्टेशनचे एपीआय निलेश बागाव, मा. जि. प. सदस्य बाळासाहेब धाईंजे, रिपाइंचे ता. अध्यक्ष मिलिंद सरतापे, दादासाहेब घाडगे, समाधान जानकर, वंचितचे प्रदीप सरवदे, ग्रामपंचायत सदस्य रायचंद खाडे, शंकर आडत, बाबासाहेब माने, काशीनाथ आडत, विश्वास वाघे, धनंजय म्हेत्रे, अमोल पनासे, जब्बार मुलाणी, कच्चु मुलाणी, शिवाजी मोहिते, अशोक बनसोडे, शिवाजी बनसोडे, गणेश सावंत, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अरुण साठे, उपाध्यक्ष सचिन साठे, खजिनदार महादेव नाईकनवरे यांच्यासह सामाजिक चळवळीतील विविध संघटनेचे पदाधिकारी व सकल मातंग समाज बांधव उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng