Uncategorizedताज्या बातम्या

वैद्यकीय सेवा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे १ डिसेंबर रोजी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजन

मुंबई (बारामती झटका)

राज्यातील गोरगरीब-निर्धन रुग्णांच्या मदतीला धावून जाणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता वैद्यकीय सेवा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर,जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग,नरिमन पॉईंट,मुंबई – ४००००२१ येथे आयोजित करण्यात आलेला आहे,असे कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अन् डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे विनम्र कळविण्यात येत आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार पक्षाचे अध्यक्ष,माजी राज्यमंत्री,आमदार श्री.बच्चु भाऊ कडू हे राहतील.

पहिले सत्र – सकाळी १०.३०.वाजता मा.श्री.गणेश शिंदे यांचे प्रेरणादायी व्याख्यान होणार असून,त्यानंतर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे संपादित वैद्यकीय मदत मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील(माजी राज्यपाल, त्रिपुरा,बिहार,पश्चिम बंगाल),मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्य सर्वश्री मा.उदय सामंत,मा.शंभूराजे देसाई,मा.दादाजी भुसे,मा.अब्दुल सत्तार, मा.संदीपान भुमरे,मा.दीपक केसरकर,मा.सुधीर मुनगंटीवार,मा.अतुलजी सावे यांच्या हस्ते होणार आहे.

याप्रसंगी मा.प्रसन्न जोशी ( कार्यकारी संपादक,साम मराठी) आणि मा.निलेश खरे(मुख्य संपादक,झी २४ तास),आमदार मा.शहाजीबापू पाटील(ब्रँड ॲम्बेसेडर,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष) मा.मंदार पारकर(अध्यक्ष,मंत्रालय व विधिमंडळ पत्रकार संघ),विनोद जगदाळे ( अध्यक्ष,टी.व्ही.जर्नालिस्ट असोसिएशन),ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख मा.नरेश म्हस्के आदी सन्माननीय मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहील.

सूत्रसंचालन – श्वेता हुल्ले/ शेखर जोगळेकर
स्नेहभोजन- दुपारी १.०० ते २.०० वा.

दुसरे सत्र – हतकणंगलेचे खासदार मा.धैर्यशील माने आणि मा.गुलाबराव पाटील (पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री) यांचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष विस्तार – वाढीसाठी रुग्णसेवकांचे कर्तव्य व जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन!

आरोग्य परिसंवाद
या कार्यक्रमात सर्वश्री मा.महेंद्र महाजन,मा तुकाराम मुंडे,डॉ.तात्यासाहेब लहाने,डॉ.एस.टी.टाकसाळे,डॉ.विजय सुरासे,डॉ.संजय ओक,मा.संतोष आंधळे,मा.संदीप आचार्य या मान्यवरांचा आरोग्यविषयक परिसंवाद होणार आहे.
सूत्रसंचालन- मा.विशाल बढे/सौ.रेश्मा साळुंखे

वैद्यकीय सेवा सन्मान सोहळा-पुरस्कार वितरण
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे,
उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस तसेच
मंत्रिमंडळातील सदस्य यांच्या हस्ते आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार होणार आहे.
सूत्रसंचालन – मिलिंद भागवत

विशेष अतिथी म्हणून सन्माननीय खासदार,आमदार,पत्रकारिता क्षेत्रातील ख्यातनाम संपादक -पत्रकार आणि बाळासाहेबांची शिवसेनाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आपले नम्र
सर्वश्री विलास जोशी,अनिल भोर,डॉ.प्रदीप धवळ,डॉ.जे.बी.भोर,हेमंत कट्टेवार,अभिजित दरेकर,

राज्य कक्ष प्रमुख रामहरी राऊत,
राज्य सहकक्ष प्रमुख ज्ञानेश्वर धुळगंडे

स्थळ – यशवंतराव चव्हाण सेंटर,जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग,नरिमन पॉइंट,मुंबई – ४००००२१.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

8 Comments

Leave a Reply

Back to top button