Uncategorized

व्यसनमुक्त संघाचे संस्थापक ह.भ.प. बंडातात्या महाराज कराडकर यांची लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, हिंदू संस्कृतीप्रमाणे सौ. संस्कृतीताई सातपुते यांनी संस्कृती जपली.

माळशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्राच्या सांप्रदायांमध्ये प्रगल्भ व्यक्तिमत्व विचारवंत व्यसनमुक्त संघाचे संस्थापक ह.भ.प. बंडातात्या महाराज कराडकर यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या मांडवे हद्दीतील पन्नास फाटा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. ‘साधुसंत येती घरा, तोची दिवाळी दसरा’ या न्यायाप्रमाणे आलेल्या अतिथींचे हिंदू संस्कृतीप्रमाणे आदरातिथ्य करणे ही आपली हिंदू संस्कृती आहे. सौ. संस्कृतीताई सातपुते यांनी ही संस्कृती जपत ह.भ.प. बंडातात्या महाराज कराडकर यांचे औक्षण करून स्वागत केले.

महाराष्ट्राच्या अध्यात्मामध्ये बुजुर्ग व्यक्तिमत्व म्हणून ह.भ.प. बंडातात्या महाराज कराडकर यांच्याकडे पाहिले जाते. समाजामध्ये व्यसनमुक्तीची चळवळ उभी करण्याकरता तरुणांची फौज निर्माण केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये व्यसनमुक्त संघाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून अनेक लोकांना व्यसनापासून परावृत्त करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत.

स्वतः ब्रह्मचर्य वैराग्य घेऊन जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र असणारे बंडातात्या यांनी जनतेची रुग्णसेवा करणाऱ्या लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी अनेक विषयावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आल्या. बंडातात्यांच्या मार्गदर्शनामुळे आमदार राम सातपुते यांना सर्वसामान्य जनतेची सेवा व कार्य करण्याची प्रेरणा मिळालेली आहे. सौ. संस्कृतीताई यांनी औक्षण करून स्वागत केले तर, आमदार राम सातपुते यांनी सत्कार करून सन्मान केला.

साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा आणि विशेष म्हणजे दसऱ्यानंतर व दिवाळीच्या पूर्वी तात्यांनी आमदार राम सातपुते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिलेली असल्याने आनंदाला पारावर उरलेला नव्हता.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button