ताज्या बातम्याशैक्षणिक

शंकरराव मोहिते महाविद्यालयात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन.

संग्रामनगर (बारामती झटका) केदार लोहकरे यांजकडून

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज व स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांचे संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळावा रविवार दि. ९ जुलै २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत आयोजित केलेला आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन स्वावलंबी बना, असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.

यामध्ये फिल्ड ऑफिसरसाठी १०० पदे उपलब्ध आहे. त्यांचे वयोगट २० ते २८ वर्षापर्यंत असावे. सीनियर फिल्ड ऑफिसरसाठी १०० पदे उपलब्ध असून त्यांचे वयोगट २० ते २८ वर्षापर्यंत फ्रेशर व एक ते दोन वर्षाचा अनुभव असावा, शैक्षणिक पात्रता कमीत कमी बारावी पास पदवी आणि पदव्युत्तर पदवी असावी.

या रोजगार मेळाव्यात निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीमार्फत मुलांसाठी मोफत राहण्याची व्यवस्था, आकर्षक वेतन, प्रवास भत्ता, मोबाईल भत्ता, कामगिरीवर इन्सेंटिव्ह, कुटुंबासाठी मेडिकल विमा (बारा महिन्यानंतर पालकांचा वैद्यकीय विमा), अपघाती विमा तसेच आय.सी.पी.एफची सवलत आहे. तरी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तरी उमेदवारांचे स्वतःची दुचाकी, दुचाकी परवाना आणि पॅन कार्ड असणे आवश्यक असून इच्छुक उमेदवारांनी त्यांचा आवश्यक बायोडाटा, ओळखपत्र आणि शैक्षणिक व कामाचा अनुभव असेलेले प्रमाणपत्र विषयक कागदपत्रे घेऊन हजर राहावे. अधिक माहितीसाठी साईरेडी आईनलावार 9324802760 यांचेशी संपर्क साधावा. हा मेळावा शंकरराव मोहिते महाविद्यालयात सेमिनार हाॅल येथे ठेवण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे व प्लेसमेंट ऑफिसर डॉ.विश्वनाथ आवाड (मो.नं.९४२२०२८८३८) यांचेशी संपर्क साधावा.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button