शरदचंद्रजी पवार यांच्या धैर्यशील मोहिते पाटील “हातात” तर देवेंद्रजी फडवणीस यांच्या आ. रणजीतसिंह मोहिते पाटील “डोक्यात”
अकलूज (बारामती झटका)
माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार तब्बल पाच वर्षाने शिवरत्न बंगला येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरिता गेलेले होते. त्यावेळेस भेट घेऊन परत जात असताना त्यांच्या हातात भाजपचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांचे फोटो असलेले पुस्तक हातात देण्यात आले. शिवरत्न बंगला येथे पवार साहेबांची नाट्यमयरित्या भेट झालेली असल्याने महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील डोक्यात बसले असल्याचे चर्चा भाजपच्या गोटामध्ये सुरू आहे.
सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते माजी कृषिमंत्री स्वर्गीय डॉक्टर गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळेस व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह माजी मंत्री, खासदार, आमदार उपस्थित होते.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पायाच्या खुब्याचे ऑपरेशन काही महिन्यापूर्वी झालेले होते. तरीसुद्धा विजयदादा जुने सहकारी असल्याने कार्यक्रमास उपस्थित होते. व्यासपीठावर शरदचंद्रजी पवार व देवेंद्रजी फडवणीस यांनी विचारपूस व चौकशी केलेली होती. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रास्ताविक सुरू असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची व देवेंद्रजी फडवणीस यांचे भाषण सुरू असताना शरदचंद्रजी पवार यांची भेट व्यासपीठावर घेतलेली उपस्थित सर्व व्यासपीठ व समोरील जनतेने पाहिले होते. शरदचंद्रजी पवार यांनी कार्यक्रम संपल्यानंतर बारामतीकडे जाताना शिवरत्न बंगला येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची पुन्हा एकदा भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केलेली असल्याने भारतीय जनता पक्षाच्या गोटात वेगळीच चर्चा सुरू झालेली आहे.
व्यासपीठावर भेट झालेली असताना पुन्हा शिवरत्न बंगला येथे शरदचंद्रजी पवार गेलेले असल्याने भाजपच्या गोटामधून मिळालेली माहिती आहे. पवार साहेबांचा दौरा जाहीर झाल्यानंतर चार दिवसांपासून मोहिते पाटील परिवार पवार परिवारांच्या व त्यांच्या निकटवर्तीयांच्या संपर्कात होते, अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे. संपूर्ण राजकीय परिस्थिती पाहता मोहिते पाटील यांचे वर्तव्य भाजपच्या लक्षात आलेले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते व पदाधिकारी कोणतीही गोष्ट बोलून दाखवत नाहीत मात्र, कृतीतून जाणीव करून देत असतात. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी आखो देखा हाल पाहिलेले असल्याने शिवरत्नवर शरदचंद्रजी पवार यांच्या हातात धैर्यशील मोहिते पाटील तर राजकीय खेळीने देवेंद्रजी फडवणीस यांच्या आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील डोक्यात बसले असल्याची भारतीय जनता पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवरून कुजबूज सुरू आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Excellent content! The way you explained the topic is impressive. For further details, I recommend this link: EXPLORE FURTHER. What do you all think?