Uncategorizedताज्या बातम्या

शरदचंद्रजी पवार सोडणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद ! आत्मचरित्राच्या प्रकाशनावर मोठी घोषणा !

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या घोषणेनंतर खळबळ…

मुंबई (बारामती झटका)


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा त्याग करणार असल्याचे पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या बातम्या समोर येत असतानाच ८२ वर्षीय शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. शरद पवार म्हणाले, अनेक वर्षांपासून राजकारणात पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. या वयात मला हे पद भूषवायचे नाही. दुसरे कोणीतरी पुढे यावे असे वाटते. आता पक्षाचा अध्यक्ष कोण होणार हे पक्षश्रेष्ठींनाच ठरवावे लागेल.

कार्यक्रमात गोंधळ
शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा करताच कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना पद न सोडण्याचे आवाहन केले. कार्यकर्ते शरद पवारांना निर्णय बदलण्याचे आवाहन करताना दिसत होते. यावेळी काही समर्थक आणि कार्यकर्तेही रडताना दिसले.

शरद पवारांच्या घोषणेनंतर अजित पवार काय म्हणाले ?
शरद पवारांच्या घोषणेनंतर अजित पवार म्हणाले, आम्ही कुटुंबीय आणि पक्षाचे नेते एकत्र बसू. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. पक्षाच्या बैठकीत शरद पवार तुमच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतील, याची खात्री मी देऊ शकतो.

५६ वर्षे मी राजकारणात !

१९६७ पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली. त्यानंतर सतत मी विविध पदांवर आहे. म्हणजेच गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. आता आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेत असल्याचे पवार यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या या घोषणेनंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार सुद्धा भावूक झाल्या. कार्यकर्त्यांनी त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी घोषणाबाजी सुरु केली.

निर्णय मागे घ्या नाही तर सभागृह सोडणार नाही…

लोक माझा सांगाती” पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस सभागृहात पवारांनी घोषणा केली आहे . हा निर्णय मागे घ्या नाही तर सभागृह सोडणार नाही अशी विनंती कार्यकर्ते करत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button