शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवलीच, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष
राष्ट्रवादीत कार्यकारी अध्यक्ष हे नवीन पद तयार करण्यात आले असून या पदावर खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल या दोघांची नियुक्ती
नवी दिल्ली (बारामती झटका)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २५ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीत कार्यकारी अध्यक्ष हे नवीन पद तयार करण्यात आले असून या पदावर खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल या दोघांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती स्वत: पवार यांनी दिली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला आणखी बळकटी देण्यासाठी राष्ट्रवादीकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.
सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणा विधानसभेचीही जबाबदारी असेल. तसंच प्रफुल्ल पटेल यांच्यावर गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सुळे आणि पटेल यांच्यासह सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड यांनादेखील राष्ट्रीय राजकारणातील जबाबदारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडून देण्यात आली आहे.
शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या राजकीय आत्मकथेच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली होती. मात्र नंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली नाराजी आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या समितीने फेटाळलेल्या राजीनाम्यानंतर पवार यांनी हा निर्णय मागे घेतला होता. तेव्हापासूनच राष्ट्रवादीच्या पक्षसंघटनेत काही प्रमाणात बदल केले जातील, अशी शक्यता वर्तवली जात होती. या शक्यतेवर आता अखेर शिक्कामोर्तब झालं असून शरद पवार यांनी पक्षात कार्यकारी अध्यक्ष हे नवे पद निर्माण केले आहे.
दरम्यान, कार्यकारी अध्यक्षपदावर सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नेमणूक करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही समाधान व्यक्त केलं आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ, सुनिल तटकरे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांचा सामावेश आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Very well written! The points discussed are highly relevant. For further exploration, I recommend visiting: LEARN MORE. Keen to hear everyone’s opinions!