शरीर व आत्मा मन यांची शांती म्हणजेच योगा बाळासाहेब सरगर
माळशिरस (बारामती झटका)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाचे पालन करीत मोदी @9 कार्यक्रमांतर्ग खूडूस तालुका माळशिरस येथील श्री श्री ध्यान मंदिर येथे आज जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला. यापूर्वी मोदी @9 कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील पहिली टिफिन बैठक व ज्येष्ठ नागरिक चर्चासत्र व सन्मान हे कार्यक्रम यापूर्वीच संपन्न झाले आहेत. तर नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगामध्ये योगा दिन साजरा केला जातो. त्याचनिमित्त आज खुडूस येथे कार्यक्रमादरम्यान बाळासाहेब सरगर जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा यांनी आपल्या मनोगतात शरीर व आत्मा मनशांती म्हणजेच योगा असे समीकरण असल्याचे सांगून पुढे ते म्हणाले शरीर व मन स्वास्थ्य टिकवण्यासाठी योगा हे दररोज नित्यनेमाने करायला हवा. त्याचबरोबर दररोज किमान 20 मिनिटे ध्यान करायला हवे तरच, शरीर सुदृढ राहण्यास मदत होईल. यावेळी सुमारे 200 विद्यार्थ्यांनी व मल्लांनी या योगात सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक बापूराव ठवरे यांनी योगाचे विविध प्रकार व त्याचे महत्त्व सांगितले.
यावेळी वस्ताद महादेव ठवरे, दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार श्रीमंत बनकर, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, सुनील कोळेकर आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng