शाळकरी मुलांनी काढली “ज्ञानोबा- माऊली-तुकाराम” नावाचा जयघोष करीत गावातून दिंड़ी
कापसेवाडी- हटकरवाडी येथील माध्यमिक व प्राथमिक शाळेचा स्तुत्य उपक्रम
माढा (बारामती झटका) राजेंद्र गुंड यांजकडून
आषाढी एकादशीचेनिमित्त साधून शनिवारी सकाळी “ज्ञानोबा-माऊली-तुकाराम” या नावाचा जयघोष करीत माढा तालुक्यातील कापसेवाडी हटकरवाडी येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून तबला, पखवाज, वीणा वाजवत, भगव्या पताका खांद्यावर घेऊन मोठ्या आनंदी आणि भक्तीमय वातावरणात दिंडी काढून अबालवृद्धांची मने जिंकली.
संस्थेचे मार्गदर्शक जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह (भैय्या) शिंदे व मार्गदर्शिका प्रणिताताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गावातील जागृत देवस्थान श्री महात्माजी महाराज यांच्या मंदिर परिसरात विद्यार्थ्यांनी विविध अभंग, गवळणी म्हणून दाखविल्या. विद्यार्थी व शिक्षकांनी गोल रिंगण करून फुगड्या खेळून ग्रामस्थांचे भरपूर मनोरंजन केले.
यावेळी श्री संत गाडगेबाबा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध संतांची केलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली. यावेळी तबलावादक म्हणून प्रभाकर कापसे, हार्मोनियम वादक म्हणून नंदू कापसे महाराज, वीणावादक म्हणून ओंकार चव्हाण, पखवाज वादक म्हणून प्रवीण लटके, तर दिंडीचे सारथ्य सहशिक्षक सचिन क्षीरसागर यांनी करून साथ दिली. प्रशालेतील विद्यार्थिनी स्नेहल जाधव हिने रुक्मिणीची वेशभूषा तर सार्थक लटके याने विठ्ठलाची हुबेहूब वेशभूषा केली होती.
यावेळी मुख्याध्यापक आण्णासाहेब पाटील, राजकुमार क्षीरसागर, प्रवीणकुमार लटके, प्रसन्न दिवाणजी, तुकाराम कापसे, छगन गवळी, पांडुरंग पालेकर, अमोल खोत, चंद्रकांत जगताप, साहेबराव गवळी, शिवाजी भोगे, सचिन क्षीरसागर, सुनील खोत, सुधीर टोणगे, अनिल तावसकर, तनुजा तांबोळी, उज्ज्वला क्षीरसागर, लहू गवळी, सागर राजगुरू, विकास कापसे, दयानंद गवळी, अनिल सदगर यांच्यासह माध्यमिक व प्राथमिक शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng