मा. सर्वसाधारण निरीक्षक, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ यांचे माळशिरस येथे आगमन

माळशिरस (बारामती झटका)
२५२ – पंढरपूर, २५३ – सांगोला व २५४ – माळशिरस (अ.जा.) या तीन विधानसभा मतदार संघासाठी मा. सुबोधकुमार, भा. प्र. से. यांची सर्वसाधारण निरीक्षक यांची नियुक्ती झाली असून दि. २८ ऑक्टोंबर २०२४ रोजी त्यांचे आगमन २५४ – माळशिरस (अ.जा.) मतदार संघातून अकलूज येथे झाले आहे.
निवडणूक कालावधीसाठी मा. सर्वसाधारण निरीक्षक श्री. सुबोधकुमार, भा.प्र.से. यांचे वास्तव्य शासकीय विश्रामगृह, महर्षी चौक, अकलूज, ता. माळशिरस येथे असणार आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्र. ८९९९२७९००९ हा असून नागरिकांना मा. निरीक्षक यांना दौऱ्याचे दिवस सोडून इतर दिवशी स. ११ ते१२ या कालावधीत सभागृह, शासकीय विश्रामगृह, अकलूज, माळशिरस येथे संपर्क साधता येईल.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.