ताज्या बातम्याराजकारण

भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस अभिमान सावंत यांचा राजीनामा

माळशिरस (बारामती झटका)

भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस व भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्य अभिमान सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबुराव खिलारे यांच्याकडे राजीनामा मंजूर होण्याबाबतचे पत्र देखील दिले आहे.

सदर पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, मोहिते पाटील परिवारातील कोणत्याही व्यक्तीशी माझे कोणतेही मतभेद नाहीत. माझी त्यांच्याशी कोणतीही कटूता व त्यांच्या विषयी नाराजी नाही‌. या पक्षाची ध्येयधोरणे आणि विचारसरणी आवडत नसल्याने मी हा पक्ष सोडत आहे. भारतीय जनता पार्टी हा कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचा पक्ष आहे. मी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारसरणीचा कार्यकर्ता असल्यामुळे भारतीय जनता पार्टी या पक्षाची विचारधारा पुढे घेऊन जाऊ शकत नाही. तसेच या पक्षाच्या सरकारने आपल्या नऊ वर्षांच्या कार्यकाळामध्ये अनेक निर्णय घेतले. त्यामधील काही निर्णय न आवडल्याने मी हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सन २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीने काँग्रेस सरकारवर अनेक आरोप करून प्रचारामध्ये जनतेवर आश्वासनाचा पाऊस पडला. जनतेने भारतीय जनता पार्टीच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून सन २०१४ व सन २०१९ मध्ये भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत दिले व भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली. परंतु, जनतेची आश्वासने पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरल्याची भावना जनतेची आहे.

महागाई कमी करण्यास सरकार अपयशी, तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या देणार देण्यात अपयशी, पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्यात हे सरकार अपयशी, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्यात तसेच गरिबांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्यात सरकार अपयशी ठरले आहे.

अनेक पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणे व त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देणे. अनेक राज्यातील इतर पक्षांची सरकारी कूटनीती वापरून पाडणे व त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे सरकार निर्माण करणे. उदा. अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, मणिपुर, मेघालय, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी आणि महाराष्ट्र.

देशात सर्वत्र एकच कर प्रणाली व नोटबंदी लागू केली. ५०० रुपये व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या व नवीन ५०० रुपये व २००० रुपये च्या नोटा चलनात आणल्या व जुन्या ५०० रुपये व १००० रुपयांच्या नोटा बँकांतून मुदतीमध्ये बदलून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात रांगा लावाव्या लागल्या. यामध्ये काही लोक मृत्यू पावले. छोटे मोठे उद्योग धंदे बंद पडले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि तरुण बेकार झाले.

या सरकारच्या कार्यकाळात अनेक ठिकाणी दलित, पद दलित, वंचित घटकातील लोकांवर अन्याय अत्याचार झाले. उदा. महाराष्ट्रात भीमा-कोरेगाव या ठिकाणी काही समाजकंटकांनी दंगल घडवून निरपराध भीम अनुयायांवर हल्ला केला. काही ठिकाणी दगडफेक व जाळपोळ करण्यात आली. पण, हे सरकार दोषी लोकांवर अद्याप कठोर कारवाई करू शकले नसल्याची भावना दलित वंचित घटकांमध्ये आहे.

मणिपूर राज्यातील हिंसाचार व दंगल रोखण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी कायदा लागू केला. हा कायदा शेतकरी विरोधी असल्याची भावना काही शेतकरी वर्गाची व त्यांच्या संघटनेची झाल्यामुळे या कायद्याच्या विरोधात १०० दिवसाच्या वर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. त्यामध्ये काही शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. अखेर, शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला व नवीन कृषी कायदा रद्द करावा लागला, हे या सरकारचे मोठे अपयश आहे.

देशाच्या नवीन “संसद” भवन इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळी विरोधी पक्षाचे मत विचारात न घेता ताठर भूमिका घेऊन या सरकारने “संसद” भवन इमारतीचे उद्घाटन केले.

खासदार राहुलजी गांधी यांची खासदारकी न्यायालयाने रद्द केल्यानंतर या सरकारने सूडबुद्धीने निर्णय घेऊन त्यांचे सरकारी निवासस्थान काढून घेण्याची घाई केली व त्यांना बेघर केले. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने खासदार राहुलजी गांधी यांना पुन्हा खासदारकी व सरकारी निवासस्थान द्यावे लागले.

स्वाभिमानी जीवन जगण्याचा मार्ग परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले आणि त्यामध्ये सर्वांना समान अधिकार बहाल केले. पण, लाभ घेणारेच मूळच्या वर्णव्यवस्थेचे समर्थन करू लागले तर त्यांना तो लाभ घेण्याचा अधिकार आहे का ? माळशिरस विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती या वर्गासाठी आरक्षित आहे आणि या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार महोदय “आपण सनातनी हिंदू असल्याचा अभिमान आहे”, व “माझ्या वडिलांनी चपला शिवल्याचा मला गर्व आहे”, असे म्हणता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोट्यावधी दलित, पद दलित व वंचित घटकातील लोकांची अनिष्ट रूढी, परंपरा व अस्पृश्यता दूर करण्यासाठी आणि जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. “मनुस्मृती” जाळली आणि आमदार महोदय सनातनी वर्ण व्यवस्थेचे समर्थन करतात काय ?, असा प्रश्न मतदारसंघातील दलित जनतेला पडला आहे. वरील सर्व प्रश्नांनी व्यथीत होऊन मी भारतीय जनता पार्टी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

या पत्राच्या प्रती भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी, भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा संघटन मंत्री धैर्यशील मोहिते पाटील, भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष बजरंग काटकर यांना देण्यात आल्या आहेत

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort