शिक्षण मंत्री नामदार केसरकर सायंकाळी करमाळ्यात
करमाळा (बारामती झटका)
शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर आज विमानाने सोलापूर येथे दुपारी तीन वाजता येणार असून तेथून ते कारने करमाळा येथे सहा वाजेपर्यंत पोहोचणार आहेत.
करमाळा येथील नालबंद मंगल कार्यालयात सायंकाळी सहा वाजता करमाळा तालुक्यातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने उर्दू शाळेच्या नववी व दहावीच्या वर्गाला मान्यता दिल्याबद्दल नामदार दीपक केसरकर यांचा सत्कार व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा मुख्यमंत्री कार्यालयाचे मंगेश चिवटे यांचा सत्कार होणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्यातील व परिसरातील सर्व मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
करमाळा शहरातील उर्दू शाळेच्या नववी ते दहावीच्या वर्गाला मान्यता मिळावी हा प्रश्न गेली बारा ते पंधरा वर्षांपासून प्रलंबित होता. मात्र संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागातील मुस्लिम विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे व त्यांना उच्चशिक्षित होण्यासाठी करमाळ्यातच नववी दहावी असावी, यासाठी या शाळेला मान्यता दिली आहे.
यावेळी मुस्लिम समाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नामदार दीपक केसरकर यांचा ऋणी असल्याची भावना मुस्लिम समाजात झाल्यामुळे या सत्काराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng