शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप
करमाळा (बारामती झटका)
शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धगटवाडी रावगांव येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेत लहान मुलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच रांगोळी स्पर्धा, वाचन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी सर्व विद्यार्थी यांना जेष्ठ नागरिक कुंडलिक धगाटे यांच्याहस्ते इंग्रजी सुलेखन वही, कार्बन पेन्सिलसह खोडरबर भेट देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.भरत धगाटे, मारुती धगाटे, पैगंबर शेख, वल्ली शेख, दादा शिंदे, विजय धगाटे , रामचंद्र धगाटे, सौ. पद्मिनी धगाटे, सौ. रुपाली जाधव, समीना शेख, शिवाजी शेळके, शिक्षक संतोष फुंदे, अशोक बरडे आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng