शेंडेवाडी येथे श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा हजारो भाविकभक्तांच्या उपस्थितीत संपन्न
शेंडेवाडी (बारामती झटका)
शेंडेवाडी येथे सालाबादप्रमाणे आज सकाळी संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्री च्या मूर्तीवर सकाळी ७ वा. फुले टाकून साजरा करण्यात आला. श्री संत सावतामाळी महाराज पुण्यतिथी उत्सव सोहळ्यानिमित्त शेंडेवाडी येथील मंदिरात श्री संत ज्ञानेश्वरी अखंड हरीनाम सप्ताह पारायण सोहळा सुरू झाला असून गावातील युवक मंडळाने शनिवार दि. १५/०७/२०२३ रोजी संजीवन समाधीस्थळ अरण येथून शेंडेवाडी अशी ज्योत आणली. रात्री ह. भ. प. मोरे महाराज यांचे सप्ताह सोहळ्यातील कीर्तन झाले. पहाटेपासूनच श्री संत सावतामाळी महाराजांवर फुले वाहण्यास माळशिरस, इंदापूर, फलटण, बारामती या तालुक्यातून हजारो भाविक आले होते. पहाटेपासून भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम सुरु होता. बरोबर सकाळी ७ वा तोफाच्या सलामीने बँडवादनाच्या सुमधूर आवाजात गुलालाची उधळण करीत फुलांचा कार्यक्रम संपन्न झाला.
त्यानंतर श्री संत सावतामाळी महाराज यांच्या फोटोची बैलगाडीतुन शेंडेवाडी गावातून वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लेझीम पथकाने गाव दणाणून गेला. तसेच गावातील युवक युवतींनी गुलालाची मुक्त उधळण करीत मिरवणूक संपन्न झाली. त्यानंतर मिरवणूक मंदिरात येताच दहीहंडी कार्यक्रम झाला. त्यानंतर सुग्रीव दामू शेंडे यांच्यावतीने महाप्रसाद भोजन देण्यात आले. त्याचा हजारो उपस्थितांनी लाभ घेतला.
या पुण्यतिथी सोहळ्यासाठी ४ ते ५ हजार भाविक उपस्थित होते. आज महिलांची नेत्रदीपक लक्षणीय उपस्थिती होती. आजपासून नागपंचमीपर्यंत हा सप्ताह सोहळा उत्सव साजरा होत असतो, अशी माहिती या ट्रष्टचे अध्यक्ष समाजभूषण सुरेश शेंडे यांनी दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरिभाऊ शेंडे (बापू), उद्योजक पोपटराव शेंडे, सावता गोरे, शिवाजी शेंडे, पोपट विठ्ठल शेंडे, रामदास सुतार, बापू सुग्रीव शेंडे, अतुल शेंडे, प्रशांत तानाजी शेंडे, राजेंद्र शेंडे, श्रीमंत शेंडे, भीमराव दडस, अंतू अण्णा शेंडे, रणजित शेंडे, सोमनाथ गोरे, गणेश शेंडे, नवनाथ गोरे, मल्हारी गोरे, समिंदर मोहिते, बबनराव शेंडे, बापू महेश शेंडे, सतीश शेंडे, अशोक शेंडे, शंकर शेंडे, सुनील शेंडे, संतोष मधुकर शेंडे आदी कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत असतात, असेही अध्यक्ष सुरेश शेंडे म्हणाले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Heath Buchy