शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माळशिरस कृषी विभाग सक्षम – श्री. सतीश कोळेकर
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माळशिरस कृषी विभाग सक्षम असून जास्तीत जास्त योजना राबविण्यासाठी कृषी विभाग परिश्रम घेत आहे, असे प्रतिपादन कृषी पर्यवेक्षक श्री. सतीश कोळेकर यांनी केले. ते तरंगफळ येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत बाजरी प्रात्यक्षिकाचे बियाणे वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी कृषी सहाय्यक श्री. नितीन शिंदे यांनी प्रात्यक्षिक बीज प्रक्रिया करून दाखवले. तसेच महाडीबीटी व म. ग्रा. रो. ह. यो. अंतर्गत फळबाग लागवड याविषयी माहिती दिली. पी. एम. एफ. यम. ई. 1 रुपयात पिक विमा योजना पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना व इतर योजनांबद्दल कृषी पर्यवेक्षक श्री सतीश कोळेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास सरपंच श्री. नारायण तात्या तरंगे, एकता शेतकरी गटाचे अध्यक्ष सुजित तरंगे, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष गोरख जानकर, जयंतीलाल तरंगे, महादेव तरंगे, सतीश कांबळे, शशिकांत साळवे, गोविंद कांबळे, विठ्ठल तरंगे, लक्ष्मण तरंगे, नवनाथ होनमाने, दादा बागाव आदी शेतकरी उपस्थित होते. यावेळी स्वागत व प्रास्ताविक सुजित तरंगे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार विलास तरंगे यांनी मानले. यावेळी एकता शेतकरी गटातील सभासदांना बाजरीचे बियाणे वाटप करण्यात आले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng