शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी – अमरसिंह माने देशमुख, तालुका उपाध्यक्ष, भाजपा
वेळापुरात अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या पिकांचे पंचनामे !
वेळापूर( बारामती झटका)
वेळापूर (ता. माळशिरस) परिसरात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांची महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष अमरसिंह माने देशमुख यांनी केली आहे.
वेळापूर परिसरात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने गहू, मका, द्राक्षे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज रोजी वेळापूर तलाठी तोरके व सहाय्यक आजिनाथ भाकरे यांचे चव्हाणवाडी, सावंत वस्ती, गायकवाड वस्ती, खोरे इनामदार वस्ती, सत्यजित जाधव यासह ४० ते ४२ शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
रवींद्र बाबर या शेतकऱ्याच्या पिकामध्ये झालेल्या नुकसानाची पाहणी तलाठी तोरके यांनी केली. यावेळी वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख, शंकरराव माने देशमुख, महेश काळे पाटील, गजेंद्र सावंत, नानासो सावंत, दत्तात्रय जाधव, उद्धव जाधव, सचिन सावंत, मनोहर शिंदे, भीमराव सावंत, विनायक माने, पंढरीनाथ लोखंडे आणि अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते.
तसेच तोंडले (ता. माळशिरस) येथील ज्ञानेश्वर विश्वंभर कोडग यांच्या ४ एकरावरील द्राक्ष बागेचे व एकरावरील बेदाणा शेडचे गाराच्या पावसाने नुकसान झाले होते. त्याची पाहणी जिल्हा कृषी अधीक्षक यांनी केली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng