शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा
सदाशिवनगर (बारामती झटका)
रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी संचलित रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांनी ‘रामन परिणामा’ चा शोध लावला होता. या त्यांच्या कार्याचा गौरव करीत 1930 मध्ये नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते. हा पुरस्कार मिळवणारे ते केवळ पहिले भारतीयच नव्हते तर अशिया खंडातील पहिले व्यक्ती होते. तेव्हापासून हा दिवस देशामध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे.
विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्यांचे विज्ञानाप्रती आकर्षण वाढावे हा उद्देश ठेऊन रत्नत्रय शिक्षण संस्थेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृती व्हावी, याकरीता विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे सादरीकरण केले. यावेळी विद्यार्थी वैज्ञानिकांच्या वेशभूषा परीधान करून आले होते. संस्थेने राबविलेल्या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी यांच्या हस्ते करण्यात आले. “शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील एकात्मिक दृष्टीकोन” समोर ठेऊन हा दिवस साजरा केला जात आहे”, असे मत या उद्घाटन प्रसंगी त्यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विविध उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी चेअरमन प्रमोद भैय्या दोशी, मुख्याध्यापक दैवत वाघमोडे सर, श्रीकृष्ण पाटील सर यांचे मोलांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
सदर प्रसंगी रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगरचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी, संचालक बबन गोफणे, वसंत ढगे, सुरेश धाईंजे, दत्ता भोसले, संचालिका भाग्यश्री दोशी, रेश्मा गांधी, सारिका राऊत, ज्योती राऊत, मुख्याध्यापक अमित पाटील सर व दैवत वाघमोडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng