Uncategorizedताज्या बातम्या

शोषित, उपेक्षितांच्या आग्रहाखातर डफळापूर जिल्हा परिषद मतदार संघातून ॲड.सौ. राजश्री अमोल पांढरे मैदानात…

जत (बारामती झटका)

डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघाचे नेतृत्व हे उच्च विद्या विभूषित महिला लोकप्रतिनिधीकडे असावे, अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे. त्याशिवाय लोकप्रतिनिधी हा लढाऊ आणि आक्रमक असला पाहिजे. यासाठी सर्व मतदार आग्रही आहेत. त्यामुळे या सर्वांच्या आग्रहाखातर तसेच विविध चळवळीतील कार्यकर्त्यांच्या विनंतीचा विचार करून, ॲड. सौ. राजश्री अमोल पांढरे यांनी मैदानात उतरणार असल्याची घोषणा केली आहे.

सौ. राजश्री पांढरे या व्यवसायाने वकील असून, त्यांचे शिक्षण, B.S.L, L.L.B, L.L.M, M.A. इतके झाले आहे. त्यांनी कोल्हापुरातल्या शहाजी लॉ कॉलेजमधून बी.एस.एल.एल.बी. चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून एल.एल.एम. आणि एम.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्या सध्या कोल्हापूर आणि सांगली न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत.

‘डफळापूर’ जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे. तर दुसऱ्या बाजूला या मतदारसंघात विकासकामांच्या नावाने बोंबाबोंब आहे. अनेक गावात प्यायला पाणी नाही, पक्के रस्ते नाहीत, काही गावात तर स्मशानभूमी नाही, एस.टी. बसची सोय नाही, शाळेला खोल्या नाहीत, त्याशिवाय शिक्षकांची संख्याही अपुरी आहे. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, दळणवळण, बाजार कट्टे, ग्रामपंचायत इमारती, बहुउद्देशीय सभाहगृहे, ओढ्यावरचे पुल, जनावरांचे दवाखाने, विविध प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या न भरलेल्या जागा, यासह पायाभूत सोयी – सुविधांचे अनेक प्रश्न जनतेला भेडसावत आहेत. गोरगरिबांच्या मूलभूत गरजांचेही प्रश्न अद्याप खऱ्या अर्थाने सुटले नाहीत. राजकारणाच्या नावावर केवळ जनतेची लूट करण्यात आली आहे. विकासकामांमध्ये अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झाल्यामुळे शासकीय योजना आणि विकासकामेही रखडली आहेत. त्यातच विकासकामांच्या प्रश्नावर, प्रशासकीय कार्यालये आणि अधिकारी वर्गाकडे जाब विचारल्यानंतर जनतेला उद्धट उत्तरे दिली जातात, टोलवाटोलवी केली जाते. कायदेशीर कारवाई करताना टाळाटाळ केली जाते. त्यामुळे शासकीय योजना मार्गी लागत नाहीत. विकासकामे वर्षानुवर्षे रखडली जातात. जनतेची कामे होत नाहीत. शासनाने दिलेला फंडही खर्च होत नाही, वर्षानुवर्ष फंडही तसाच पडून राहतो. अनेकदा तो परतही जातो. कृषी, महिला, बालकल्याण, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, अर्थ, बांधकाम, नियोजन अशा विविध विभागांतील योजना जनतेपर्यंत पाहिजे तशा पोहचत नाहीत. फायलींचा निपटारा होत नाही. जनतेची कामे वर्षानुवर्षे रखडलेल्या अवस्थेत राहतात. त्यामुळे या सर्व अंगाने सभागृहात विषय मांडणारा, धडा – धडा बोलणारा, भूमिका घेणारा, भूमिका मांडणारा, जनतेचे प्रश्नं पोटतिडकीने सोडविण्यासाठी वेळ देणारा, सामाजिक प्रश्नांची जाणिव असणारा, वेळप्रसंगी आंदोलनाची भूमिका घेणारा, अधिकाऱ्यांना जाब विचारणारा, शासनं आणि प्रशासनावरती पकड असणारा लोकप्रतिनिधी पाहिजे. अशी जनतेची भावना आहे. कारण कायद्याची जाण असणारे, नियोजन, योजना आणि धोरणं आखणारे व त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणारे लोकप्रतिनिधी ही आज काळाची गरज झाली आहे. आणि ॲड. राजश्री अमोल पांढरे या हे सर्व प्रश्नं सोडविण्यासाठी तसेच सर्वच बाबतीत आघाडीवर राहतील असा जनतेला ठाम विश्वास आहे.

एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोटी, अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला येऊनही जिद्द, चिकाटी, परिश्रम या जोरावर सौ. राजश्री पांढरे यांनी सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातही आपल्या कार्याने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रातही त्यांनी अमोल पांढरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, संत महात्मा बसवेश्वर, मॉं जिजाऊ, क्रांतीजोती सावित्रीबाई फुले, थोरले सुभेदार मल्हार होळकर, पुण्यश्लोक, लोकमाता – राजमाता अहिल्यादेवी होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, नरवीर उमाजी नाईक, संत रोहिदास, भारताच्या आद्य महिला स्वातंत्र्यसेनानी भिमाबाई होळकर, क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथ (आण्णा) नायकवडी, भाई गणपतरावजी देशमुख अशा महान व्यक्तिमत्त्वांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे यांच्या विचारांना प्रमाण मानूनच त्यांनी शिक्षणासह समाजकार्यात इथपर्यंत मजल मारली आहे. आणि या महापुरुषांच्या विचारांचा वारसा, पुरोगामी विचारांचा वारसा त्यांनी राजकारणात व समाजकारणातही जोपासला आहे.

सामाजिक कार्यकर्ते, अमोल पांढरे यांच्या खांद्याला खांदा लावून लढत असताना, त्यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांचा जगातील पहिला ऑडिओ – व्हिडिओ शाहिरी पोवाडा तयार करण्यासाठी पुढाकार घेतला, ओबीसी आरक्षण आंदोलन, वंचित – बहुजन समाजाचे राजकीय भागीदारी आंदोलन, धनगर आरक्षणं आंदोलन, आदिवासी धनगर साहित्य संमेलनं, सोलापूर विद्यापीठ नामांतर लढा, महाराजा यशवंतराव होळकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक, धनगर ऐक्य अभियानं, मेंढपाळ बांधवांचे हक्क व अधिकार अशा असंख्य विषयांच्यावरती उभारलेल्या आंदोलनात त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. तन – मन – धनाने या सर्व चळवळींना साथ दिली आहे. त्याशिवाय संत सद्गुरु बाळूमामा यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार, महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विविध जिल्ह्यातील बिरोबा मंदिरांसह धनगर समाजातील विविध श्रद्धा आणि शक्तीस्थळांचा, अध्यात्मिक स्थळांचा प्रचार व प्रसार करत असताना… अमोल पांढरे यांच्या पाठीशी ठामंपणे उभ्या रहात, त्यांनी त्यांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. गोरगरीबांच्या हक्काच्या वकील म्हणूनही वकिली क्षेत्रात त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

यशवंत सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी हे पक्ष आणि संघटना उभा करण्यात व वाढवण्यात त्यांनी अमोल पांढरे यांच्या बरोबरीने आपले आयुष्य खर्ची घातले आहे. त्यामुळेच अमोल पांढरे आणि राजश्री पांढरे यांनी घेतलेले अपार कष्ट महाराष्ट्रातील जनतेने आपल्या हृदयावर कोरुन ठेवले आहेत. तेंव्हा त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन मतदार संघातील जनतेने, राजश्री पांढरे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याविषयी आग्रह धरला असता, त्यांनी तमाम जनतेच्या इच्छेखातर डफळापुर जिल्हा परिषद मतदार संघातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अधिकृत निर्णय जाहीर केला आहे.

स्वावलंबन, शिक्षण, संघटन या त्रिसुत्रीवर काम करत असताना, महिला स्वावलंबी झाल्या पाहिजेत. त्यांच्या हाताला कामं मिळाले पाहिजे. ही त्यांची भुमिका आहे. मागेल त्याला कामं आणि कामाप्रमाणे दामं मिळालेच पाहिजे. त्यासाठी उद्योगधंद्यांची निर्मीती फार झपाट्याने झाली पाहिजे, लहानं, मध्यमं आणि विशाल प्रकल्पं उभारले पाहिजेत. हा त्यांचा विचार आहे. बेरोजार युवक – युवती यांच्यासाठी त्यांना काम करायचे आहे. शेतीला हिरवा शालू नेसविण्याचे त्यांचे स्वप्नं आहे. शेवटचा माणूस सुखी झाला पाहिजे. यासाठी सर्व शासकीय योजनांचा लाभ त्याला मिळाला पाहिजे. त्यासाठी विविध योजनांचे पुनर्वालोकनं झाले पाहिजे. योजना आणि धोरणं निर्मीती व अंमलबजावणीमध्ये गोर – गरीब आणि शेवटचा माणूस केंद्रबिंदू असला पाहिजे. भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ व पारदर्शी कारभार हा त्यांचा विचार आणि व्हिजनं आहे. आणि त्यासाठीच आपली उमेदवारी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तर त्यांच्या या निर्णयाचे जत तालुक्यासह संपुर्ण सांगली जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून जोरदार स्वागत होत आहे. एक तगडा, सुशिक्षित आणि उच्च विद्या विभूषित उमेदवार या निवडणुकीत मैदानात उतरणार असल्याने मतदारसंघातील जनतेचा पाठिंबाही त्यांना झपाट्याने वाढत आहे.

एकूणच, डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक चळवळी, संघटना यांच्यामध्ये कार्यरत असलेल्या तमाम अमोल पांढरेप्रेमींनी, नेते, कार्यकर्ते तसेच सर्व समाजबांधवांनी ॲड. सौ. राजश्री अमोल पांढरे यांना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

5 Comments

Leave a Reply

Back to top button