Uncategorized

श्रीपुर महावितरण कार्यालयासमोर युवक काँग्रेसचे धरणे आंदोलन


श्रीपुर (बारामती झटका)

श्रीपूर महावितरणाच्या मुजोर अधिकार्यांच्या मनमानी कारभारा विरोधात जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस किशोरराजे गाडे पाटील, सामाजिक कार्यकर्ते किरण भांगे, रोहित काळे, शेतकरी संघटनेचे शिवराम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.

येथील दिव्यांग सचिन सदगर यांच्या घराचे बांधकाम करत असताना महावितरणचे कर्मचारी नाहक त्रास देत होते. विजग्राहक सत्यम काळे यांना कोणतीही नोटीस न देता वीजपुरवठा खंडित केलेला होता. महावितरणने विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 56 कायद्याचे उल्लंघन करत अनेकांचे वीजपुरवठे खंडित केले आहेत व जास्तीचा दंड आकारला होता. तसेच श्रीपुर येथील अधिकारी टप्या-टप्याने वीज बिल भरून घेत नव्हते. या मनमानी कारभाराविरोधात युवक काँग्रेसने आंदोलन केले.

महावितरणचे वरिष्ठ अधिकारी ओमासे सो. व वेळापूर विभागाचे उपअभियंता बोधे सो. यांनी आंदोलकांची भेट घेतली. आंदोलनकर्त्याचे म्हणणे ऐकून वीजबिल टप्या-टप्प्याने भरण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. व श्रीपुर येथील अधिकारी यांना खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यास सूचना दिल्या. श्रीपुर सबस्टेशनचे सहाय्यक अभियंता सुळ यांच्या बदलीच्या मागणीचे निवेदन स्विकारले.

तसेच आगामी बोर्डाच्या परीक्षा काळात वीज भारनियमन करून विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये, असे किशोरराजे गाडे-पाटील यांनी सांगितले. तर महावितरणने लेखी नोटीस दिल्याखेरीज वीजपुरवठा खंडित करू नये, असे आवाहन किरण भांगे यांनी केले.

या आंदोलनास राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य मौला चाचा पठाण, नगरसेवक विक्रम लाटे यांनी पाठिंबा देत उपस्थिती दर्शवली. तसेच संजय लोहार, शैलेश जाधव, असिफ शेख, बाळू भोसले, प्रज्वल काळे, सचिन दूपडे, मयूर जाधव, चांगदेव साळुंखे, अनिकेत यादव, सौरभ धुमाळ, सचिन शिंदे, लखन शेंडगे, सचिन गाडे, अजय गाडे, दत्ता सावंत, पप्पू इंगळे, सूरज गाडे आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button