Uncategorized

श्रीमती यशोदा नामदेव माने पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन..

पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांना मातृशोक…

माळशिरस ( बारामती झटका )

कण्हेर ता. माळशिरस येथील श्रीमती यशोदा नामदेव माने पाटील यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि. १४/३/२०२३ रोजी पहाटे अकलूज येथे दवाखान्यात उपचारादरम्यान दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात आठ मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या.

कण्हेर गावामध्ये यशोदाबाई व नामदेव यांना नऊ मुले व तीन मुली होते. त्यापैकी एक मुलगा वारलेला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत प्रपंच करून समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण केलेला होता. काही महिन्यापूर्वी नामदेव माने पाटील यांचे दुःखद निधन झालेले आहे. वडिलांच्या दुःखातून सावरत असताना मातोश्री यशोदा यांचे दुःखद निधन झालेले आहे. आठ भाऊ आणि तीन बहिणी एका वर्षाच्या आत आई-वडिलांना पोरक्या झालेल्या आहेत.

यशोदा माने पाटील यांच्यावर कण्हेर (रानमळा) येथे राहत्या निवासस्थानाशेजारी शेतामध्ये मंगळवार दि. १४/३/२०२३ रोजी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी अंत्यविधी होणार आहे. यशोदा माने पाटील यांच्या दुःखद निधनाने माने पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्या दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो आणि मृतात्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button