श्रीमद् सर्वेश्वर मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम भक्तिमय वातावरण व उत्साहात संपन्न झाला.
श्रीमद् भागवत समाप्ती व काल्याचे किर्तन झी टॉकीज फेम ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांचे सुश्राव्य किर्तन उद्या शुक्रवारी सकाळी 10 ते 12 वेळेत होणार
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरसमधील दहा दारे याठिकाणी श्रीमद् सर्वेश्वर मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम दि. 17/08/2022 रोजी परमपूज्य नवनाथबाबा यांच्या शुभहस्ते भक्तीमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाला.
परम पूज्य स्वामी विद्यानंदजी यांनी माळशिरस येथे दहा दारे याठिकाणी शिष्यांच्या कल्याणासाठी श्रीमद् सर्वेश्वर सिध्दाश्रमाची स्थापना केली आहे. या तपोभूमीत जास्तीत जास्त शिष्यांनी येऊन साधना करावी आणि आपल्या जीवाचे कल्याण करून घ्यावे, यासाठी या सिध्दाश्रमाची निर्मिती केली. स्वामिजीच्या या महत कार्याला गती देण्यासाठी 13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान भावार्थ श्रीमद् भागवत व भावार्थ मुक्तीबोध या ग्रंथाचे पारायण किर्तन व सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वामी विद्यामंदिर सेवा मंडळाचे भाविक भक्त जळगाव, भुसावळ, पुणे, नागपूर, नाशिक, अशा अनेक जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून भाविक भक्तांनी उपस्थिती लावली होती. व श्रीमद् सर्वेश्वर सेवा मंडळ माळशिरस सर्व साधकांची लक्षणीय उपस्थिती होती. निसर्गरम्य वातावरणात भक्तीचा आनंद ओसंडून वाहत होता. संपूर्ण परिसर भक्तीमय झालेला आहे. सर्व भाविकांच्या निवासाची व भोजनाची सोय उत्तमरीत्या करण्यात आली होती.
गुरूवार दि. 18/08/2022 सायं 9.30 वा. विश्व वारकरी संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष ह.भ.प. प्रमोद महाराज शिंदे पंधारवाडी यांचे सुश्राव्य किर्तन झाले आहे. शुक्रवार दि. 19/08/2022 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये श्रीमद् भागवत समाप्ती व काल्याचे किर्तन झी टॉकीज फेम ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. तरी माळशिरस पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे श्रीमद् सर्वेश्वर सेवा मंडळ माळशिरस यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng