ताज्या बातम्यासामाजिक

श्रीमान शेठ धन्यकुमार मोतीचंद दोशी, वेळापूर (उपळाईकर) यांना देवआज्ञा झाली.

वेळापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष वीरकुमार दोशी यांचे बंधू होते.

वेळापूर (बारामती झटका)

वेळापूर ता. माळशिरस येथील सुप्रसिद्ध आडत व्यापारी श्रीमान शेठ धन्यकुमार मोतीचंद दोशी वेळापूर, उपळाईकर यांना आज बुधवार दि. सकाळी 6.30 वाजता देवआज्ञा झालेली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजय, दोन मुले, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. वेळापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष वीरकुमार दोशी यांचे ते बंधू होते.

दोशी यांचे मूळ गाव माढा तालुक्यातील उपळाई आहे. अनेक दिवसापासून त्यांचे वास्तव्य वेळापूर-मळोली रोडवर आहे. धन्यकुमार व वीरकुमार दोघा भावांची जोडी राम-लक्ष्मणासारखी होती. व्यापार क्षेत्रामध्ये त्यांनी आपला नावलौकिक मिळविलेला होता. सर्वांशी मिळून मिसळून वागणारे दोशी परिवार आहे. धन्यकुमार यांना नवजीवन व धीरज दोन मुले आहेत. धन्यकुमार यांच्या दुःखद निधनाने दोशी परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. वेळापूर पंचक्रोशीत धन्यकुमार यांच्या दुःखद निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

धन्यकुमार यांच्यावर वेळापूर येथील सर्व धर्मीय स्मशानभूमी या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा सकाळी 11.30 वाजता सांगोला रोड येथील राहत्या घरापासून स्मशानभूमीकडे जाणार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button