श्रीराम कृषी महाविद्यालयाच्या कृषिदुतांकडून फळबागवर पडणाऱ्या रोगांवर प्रतिबंधक उपाय, योजनाविषयी पाटिलवस्ती येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
पानिव (बारामती झटका)
श्रीराम कृषि महाविद्यालय या महाविद्यालया अंतर्गत सुरू असलेल्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषिदूतांकडून फळबागावर पडणाऱ्या रोगांवरील प्रतिबंधक उपाय पटवून शेतकऱ्यांसमवेत प्रात्यक्षिक देण्यात आले. पीक व फळबागामध्ये विविध कीटक व हवामान बदलामुळे रोगांचा प्रादु्भाव सतत जाणवत असतो. आणि अशा होणाऱ्या हवामान बदलामुळे वातावरणात विषाणूजन्य कीटक तयार होऊन पीक व फळबागावर रोगराई पसरून त्याचा फार मोठा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेवर होत असतो. त्यामुळे कृषिदूतांनी हे लक्षात घेऊन पाटीलवस्ती ता. माळशिरस येथील शेतकऱ्यांना फळबागावर पडणाऱ्या रोगांवरील प्रतिबंधक उपाय या बाबत प्रत्यक्षात प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
यामध्ये कृषिदुतांनी आंबा बागावरती बोर्डो मिश्रणाची फवारणी केली व त्याचे महत्व शेतकऱ्यांना पटवून दिले. हे मिश्रण प्रभावी बुरशी नाशक असून वेगवेगळ्या फळबागावर फवारणीसाठी वापर केला जातो. वर्षातून कमीत कमी तीन वेळा फवारणी केली असता फळबागांवर पडणाऱ्या रोगांवर निच्छितच आळा बसतो. अशा प्रकारे प्रात्यक्षिकातून माहिती कृषिदुतांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितली.
या मिश्रणासाठी चांगल्या प्रतीचा मोरचुद व चुना वापरावा व तयार केलेले मिश्रण त्याच दिवशी वापरावे. याचा फायदा निच्छितच पाटीलवस्ती गावातील व परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे, असे यावेळी कृषिदुतांनी सांगितले. या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमास अस्वले विश्वजीत ज्ञानेश्वर, बोराटे विशाल बाळू, धायगुडे सुशांत संपत, मुळीक विराज अनिल, थोरवे गणेश राजेंद्र व वाबळे संग्राम दत्तात्रय या कृषिदुतांनी बोर्डो मिश्रणाचे महत्व, फायदे व पेस्ट बॉर्डो मिश्रण तयार करण्याची पद्धत समजावून सांगितली. यावेळी पाटीलवस्ती गावचे प्रगतशील बागायतदार अभिजित इंगळे, तुकाराम घुले आदी शेतकरी उपस्थित होते. प्रात्यक्षिकासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. बी. हाके, कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. आय. शेख तसेच पिकरोग निदानशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक के. पी. वाघे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Thank you very much for sharing, I learned a lot from your article. Very cool. Thanks. nimabi
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.