श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सभासद व शेतकरी यांचा विश्वास संपादन केला.
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी, सभासद व कामगार यांची दिवाळी गोड होणार.
सदाशिवनगर ( बारामती झटका )
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभाच्या वेळी शेतकरी, सभासद व ऊस उत्पादक यांना सन 2021-22 गळीत हंगामामध्ये गळीतास आलेल्या ऊस उत्पादकांना 2100 रुपये बिलाची रक्कम अदा केलेली होती. उर्वरित रक्कम आठ दिवसात जमा करण्याचे आश्वासन दिलेले होते. दोनशे रुपये शेतकरी, सभासद, ऊस उत्पादक यांच्या खात्यावर वर्ग केलेली आहे. तसेच सन 2015-16 गळीत हंगामातील प्रलंबित ऊस बिलाची दहा टक्के रक्कम अदा केलेली आहे. त्यामुळे आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सभासदांचा व शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेला आहे. उर्वरित एफआरपी मधील रक्कम दिवाळी पूर्वी जमा होणार असल्याने सभासद व कामगार यांची दिवाळी गोड होणार असल्याने सभासद, ऊस उत्पादक शेतकरी यांच्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे.
श्री शंकर सहकारी साखर कारखाना तीन वर्ष बंद असताना आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडे सदर कारखान्याची चेअरमन पदाची जबाबदारी आलेली होती. आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी बंद कारखाना अथक प्रयत्नातून सुरू केलेला होता. कारखाना सुरू करण्यास आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांची दोन वर्ष गेलेली होती. कारखाना सुरू केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आले होते. मोहिते पाटील परिवार राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले असल्याने साखरेची नाडी भाजपच्या ताब्यात असल्याने श्री शंकर सहकारी साखर कारखान्याला सरकारकडून आर्थिक मदत झालेली नव्हती. केंद्रामध्ये भाजपचे सरकार असूनसुद्धा महाराष्ट्रात भाजप विरोधी सरकार असल्याने श्री शंकर सहकारी साखर कारखान्याला मदत करता आलेली नव्हती.
सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे सरकार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्यावर विश्वास ठेवून मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता. लोकसभा व विधानसभेत मोहिते पाटील यांनी प्रामाणिकपणे भाजपचे काम करून खासदार व आमदार निवडून देण्यात मोहिते पाटलांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे रणजीतसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर आमदार केलेले आहे. सध्या केंद्रात व राज्यात भाजपच्या विचाराचे सरकार असल्याने श्री शंकर सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी देवेंद्रजी फडवणीस यांनी विशेष लक्ष देण्याची गरज सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांच्यामधून बोलले जात आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व तालुक्याचे नेते जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बंद कारखाना सुरू करीत असताना माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी रात्रंदिवस कारखान्याच्या कार्यक्षेत्रात काम केलेले आहे. कारखाना बंद असताना सदाशिवनगर पंचक्रोशीतील व्यापारी व स्थानिक नागरिक यांनी अनेक अडचणी पाहिलेल्या आहेत तालुक्यात उसाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. यासाठी श्री शंकर सहकारी साखर कारखाना आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे अडचणीतून गतवैभवाकडे वाटचाल करील असा विश्वास सभासद, शेतकरी व ऊस उत्पादक यांच्यामधून बोलले जात आहे. कारखान्याने यंदाच्या वर्षी गाळपासाठी धरलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त ऊस गाळपासाठी येणार आहे. त्यामुळे कारखान्यात चेअरमन आ. रणजितसिंह मोहिते पाटील व अर्जुनसिंह मोहिते पाटील जे धोरण ठरविणार तेच सभासद व शेतकऱ्यांचे तोरण ठरणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Hey there! Looking to save on energy costs?
Look no further! At Nexus Energy Group Ltd., we’ve got your back. With over two decades of experience, we’ll help you navigate the energy markets, find the best rates, and keep your wallet happy. Let’s power up together! Reply for details: [email protected]
This was a fascinating read. The points made were very compelling. Lets discuss further. Check out my profile for more engaging content!