Uncategorized

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे डांबरी रस्त्याच्याकडेला शाडूमातीने साईडपट्ट्या भरल्या आहेत.

वरूण राजाचे आगमन झाल्यास वारकरी व भाविक यांना घसरगुंडी खेळत यावी लागेल.

नातेपुते (बारामती झटका)

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात शुक्रवार दि. 23 जून 2023 रोजी आगमन होणार आहे. पालखी महामार्गाची डागडुजी व सफाई केलेली आहे. पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग तयार करण्याचे अंतिम टप्प्यात काम आलेले आहे. नातेपुते व माळशिरस गावाला बाह्यवळण देऊन महामार्ग केलेला आहे. मात्र, पालखीचा मार्ग जुनाच आहे. जुन्या पालखी मार्गाला नातेपुते व माळशिरस हद्दीमध्ये रस्त्याचे डांबरीकरण केलेले आहे. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईडपट्ट्या भरत असताना मुरूम वापरणे गरजेचे होते. मात्र, शाडू माती वापरून दोन्ही बाजूने साईडपट्ट्या भरलेल्या आहेत. साईडपट्टीची माती व लहान रेती रस्त्याच्या दोन्ही बाजूने चार ते पाच फूट डांबरीवर आलेली आहे. मोठी अवजड वाहन जात असताना मोटर सायकलस्वार व पायी चालणारे वारकरी व भाविक भक्त यांच्या डोळ्यांमध्ये माती व लहान रेती जात आहे. त्यामुळे नाहक त्रास होत आहे.

उद्या माऊलींच्या पालखीचे आगमन माळशिरस तालुक्यात होऊन नातेपुते येथे माऊलींचा मुक्काम होणार आहे. सध्या वातावरण बदललेले आहे. वरूण राजा कधी येईल सांगता येत नाही. जर वरूण राजाने हजेरी लावली तर पुणे-पंढरपूर रोडवर पालखी महामार्गावर शाडू माती असल्याने चिखल होऊन भाविक व वारकरी यांचे चिखलामुळे पाय घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे घसरगुंडी करीत प्रवास करावा लागणार आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी ,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रांत तहसीलदार, गटविकास अधिकारी यांची वातानुकूलित गाडीमधून पालखी महामार्गावरून देखरेख सुरू असते. मात्र, खरी पाहणी पायी किंवा मोटरसायकलवर प्रवास केल्यानंतर समजणार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया पालखी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वारकरी व भाविक भक्तांमधून येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button