संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ यांच्यावतीने १७ व्या राज्यस्तरीय भव्य लेझीम स्पर्धेचे आयोजन
अकलूज (बारामती झटका)
‘जनशक्ती हीच राष्ट्र शक्ती’ हे ब्रीद घेऊन संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ, अकलूज व शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त दि. 9 व दि. 10 जानेवारी 2023 या कालावधीत 17 व्या राज्यस्तरीय भव्य लेझीम स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. संग्रामसिंह मोहिते पाटील व मंडळाच्या कार्याध्यक्ष कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी दिली.
सदरच्या स्पर्धा मंडळाचे मार्गदर्शक श्री. जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहेत. आत्तापर्यंत मंडळाच्या वतीने 45 हजारापेक्षा जास्त खेळाडू तयार केले असून विशेष बाब म्हणजे अकलूजच्या या लेझीम खेळाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहे.
विजय चौक, अकलूज या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेसाठी शालेय शहरी व ग्रामीण मुले गट तसेच शालेय शहरी व ग्रामीण मुली गट, प्राथमिक गट व अति ग्रामीण गट असे गट ठेवण्यात आले असून या गटाकरिता प्रथम क्रमांक रुपये 3101/-, द्वितीय क्रमांक रुपये 2501/-, तृतीय क्रमांक रुपये 2001/- व स्मृतिचिन्ह तर प्राथमिक गटासाठी रुपये प्रथम क्रमांक 2501/-, द्वितीयसाठी रुपये 2001/-, व तृतीयसाठी रुपये 1501/- व स्मृतिचिन्ह या बक्षीसाबरोबरच उत्कृष्ट लेझीम प्रशिक्षक, उत्कृष्ट हलगी वादक, उत्कृष्ट घुमके वादक, उत्कृष्ट सनई वादक अशी स्वतंत्र रोख रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
मंडळाच्या वतीने प्रत्येक संघास मोफत भोजनाची सुविधा पुरविण्यात येणार आहे. प्रत्येक संघात किमान 30 खेळाडू व प्रत्येक संघास दोन डाव सादर करावयाचे आहेत. खेळाडूंचा गणवेश एकसारखा असावा. स्पर्धा गुण पद्धतीने ठेवल्या जाणार असून याकरिता पन्नास पंच कार्यरत आहेत.
या स्पर्धेसाठी विविध कमिट्या कार्यरत असून स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी सचिव संजय राऊत 98 90 43 42 10, अर्जुन बनसोडे 98 60 33 79 43, बिबीशन जाधव 9860 39 608, सुजित कांबळे 84 21 10 11 21, राजकुमार गोरे 94 22 0 28 664 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहनही मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी मंडळाचे सर्व सदस्य कार्यरत आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng