Uncategorizedताज्या बातम्या
संतोष माने यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदी निवड
सांगली (बारामती झटका)
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने संतोष दत्तात्रय माने, सांगली यांची या संस्थेच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी सन 2023 ते 2026 या कालावधी करिता निवड करण्यात आली आहे. तशा आशयाचे पत्र देखील संतोष माने यांना देण्यात आले आहे.
संतोष माने यांचे पर्यावरण संरक्षण, संवर्धन व त्यासंबंधी केलेली जनजागृती, वृक्षारोपण आणि संवर्धन या कार्याची राज्य पातळीवर दखल घेऊन या संस्थेच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल संतोष माने यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng