संत चोखामेळा महाराज हे समता आणि बंधुता या विचारांचे अधिष्ठान होय – स्वामी नरेंद्राचार्य महाराज
माळशिरस (बारामती झटका)
समाजाला समता अन बंधुभाव या मूल्यांचा संदेश देणारी ‘चोखोबा ते तुकोबा’ ही वारी समाजाला दिशा देणारी आहे. संत चोखामेळा महाराज यांचे संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाच्या विचारांच्या प्रसारार्थ गेले. ते स्वत: या मुल्यांचे अधिष्ठान मानावेत असा त्यांचा अधिकार आहे, असे प्रतिपादन स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले. समता वारी २०२३ पोस्टर अनावरण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभ्यासक निलेशजी गद्रे, समता वारी निमंत्रक सचिन पाटील, कवी फुलचंद नागटिळक, ऋषिकेश सकनुर, अविनाश अभंगराव आदी उपस्थित होते.
माणसांच्या मनामनात उभ्या राहिलेल्या विद्वेशाच्या भिंती नाहीशा व्हाव्यात, मनात साचलेली अहितकारक किल्मिषे संत ज्ञानदेवांच्या “दुरिंताचे तिमिर जावो” या प्रकाशमान विचारात नष्ट व्हावीत, निरामय समाज जीवनासाठी तुकोबांचा “भेदाभेद भ्रम अमंगळ” हा विचारच पथदर्शक ठरेल हे जाणून, आपल्या वारकरी संतांनी सांगितलेला हा मानवीय विचारांचा वारसा तरुण मित्रासमोर घेउन जावा. सामाजिक लोकशाहीचा दिव्य वसा सांगणाऱ्या अन समता, मानवता व बंधुभाव हा वारकरी संप्रदायातील चिरंतन विचार पुन्हा जनामनात रुजला जावा, या सदहेतूने “चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची” ही नावीन्यपूर्ण संकल्पना संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन राबवित आहेत. समाजाला दिशा देणाऱ्या समता वारीचे समाज नक्कीच स्वागत करेल असे प्रतिपादन त्यांनी केले.
महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यातून १७०० किलोमीटर वारीचा प्रवास राहणार असून, वारकरी संप्रदायातील समता, मानवता, बंधुता या उच्च मूल्यांचे दर्शन घडवणारी चित्रफीत दाखविण्यात येणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Sveiki, aš norėjau sužinoti jūsų kainą.