संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दरम्यान नातेपुते येथे वारकऱ्यांना व नागरिकांना संरक्षण मिळण्यासाठी शिवसेनेचे अमोल उराडे यांच्याकडून प्रशासनास निवेदन
नातेपुते (बारामती झटका)
कैवल्य चक्रवर्ती सम्राट संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दरम्यान वारकऱ्यांना व नागरिकांना संरक्षण मिळण्यासाठी शिवसेनेचे माळशिरस तालुका उपप्रमुख अमोल उराडे यांच्याकडून नगर पंचायत प्रशासनास निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की नातेपुते नगरीत कैवल्या चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दरम्यान मोठे दुकाने तसेच मोठे मोठे पाळणे येत असतात तसेच सदर मोठ्या पाळण्याच्या आजूबाजूला बऱ्याच आपल्या नगरीतील व आजूबाजूच्या गावामधील व शेजारील जिल्ह्याबाहेरील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्याच गर्दीचा फायदा घेऊन काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून महिलांची मुलींची छेडछाड करणे नाहक नागरिकांबरोबर भांडण वाद तक्रार करणे चोऱ्या करणे याचे प्रमाण या पालखीच्या दिवशी यामागे दिसून आलेले आहे व दरवर्षी याचा ग्रामस्थांना नागरिकांना अनुभव ही आलेला आहे याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने नातेपुते नगरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दरम्यान वारकऱ्यांना व नागरिकांना संरक्षण मिळावे यावेळी उपस्थित शिवसेना तालुका उपप्रमुख अमोल उराडे शहर प्रमुख सनी गवळी उपशहर प्रमुख रियाल तांबोळी उपशहर प्रमुख संजय चांगण तसेच शिवसैनिक निशांत इंगोले लखन चांगल नवनाथ राऊत हे उपस्थित होते हे निवेदन नगरपंचायतीचे अशोक जावरे यांनी स्वीकारले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng