सत्ता असो अथवा नसो पक्ष वाढीचे काम सुरूच राहणार आहे : पै. अक्षयभैय्या भांड.
देशाचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचा विचार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धरणे तळागाळात पोहोचेल – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव पै. अक्षयभैया भांड.
नातेपुते ( बारामती झटका )
देशाचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांचा विचार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे तळागाळात पोहचविण्यासाठी भविष्यात प्रयत्न करणार आहे. पक्ष काम करणार आहे, सत्ता असो अथवा नसो पक्ष वाढीचे काम जोराने सुरू राहणार असल्याचे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव पैलवान अक्षयभैय्या भांड त्यांनी बारामती झटक्याशी औपचारिक चर्चा करताना सांगितले.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/07/WhatsApp-Image-2022-06-20-at-5.20.17-PM-1024x819-1.jpeg)
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/07/1.png)
देशाचे नेते शरदचंद्रजी पवार, विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख यांनी आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये केलेले काम व पक्षावरील निष्ठा यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी काम करण्याची संधी मिळालेली आहे. या संधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे तळागाळात जनतेपर्यंत पोहोचवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीचे काम करणार असल्याचे सांगितले.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/07/Screenshot_2022_0715_081823-591x1024.png)
आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, महानगरपालिका या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त युवकांना संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. जिह्यामध्ये लवकरच दौरा करून तालुका निहाय बैठका घेऊन युवकांचे संघटन जोमाने उभा करण्याकरिता तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांच्याशी विचार विनिमय करून भविष्यातील पक्ष वाढीसाठी रणनीती ठरविणार आहे.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/07/Screenshot_2022_0714_213451.png)
सत्ता असो अथवा नसो पवार साहेबांच्या व राष्ट्रवादीच्या विचाराची जनता ठाम आहे. जनतेपर्यंत पोहोचून सर्वसामान्य लोकांच्या अडचणी समजून घेऊन वरिष्ठांच्या सहकार्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तरुणांची फौज उभा करून पुन्हा एकदा जोमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उभारणी करून राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणण्यासाठी तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण केले जाईल.
प्रदेश सचिवपदी नेमणूक करून माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी पक्ष संघटनेसाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव पैलवान अक्षयभैया भांड यांनी सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/07/Screenshot_2022_0707_163608.png)