सत्ता नसताना केली ४० कोटींची विकासकामे आता सत्तेच्या माध्यमातून होईल कामाचा धडाका…
४३ दिवसाच्या उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील सज्ज
नगरपरिषदेच्या माध्यमातून गावाच्या विकासात भर टाकण्यासाठी शिवतेजसिंह यांनी पुढाकार घेऊन पुन्हा एकदा नेतृत्व करण्याची, समस्त गावकर्यांची इच्छा
अकलूज (बारामती झटका)
सदैव अकलूजच्या विकासाचा ध्यास मनात ठेऊन कार्यमग्न असणार्या शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात जवळपास ४० कोटी रूपयांची विकासकामे करून गावातील नागरीकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे राज्यात व जिल्ह्यात सत्ता नसतानाही शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर विविध खात्याच्या माध्यमातून सुमारे 40 कोटींची विकासकामे केली.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, आ.रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाबरोबरच किशोरसिंह माने पाटील, उपसरपंच धनंजय देशमुख यांच्या अनुभवाचा उपयोग करून पाच वर्षात जीआयएस प्रणालीद्वारे घरपट्टी आकारणी, सीसीटीव्ही कार्यप्रणाली, घंटागाड्यांना जीपीएस, सिग्नल व्यवस्था, ओढ्याचे खोलीकरण रूंदीकरण, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या व दिव्यांगासाठी विविध उपाययोजना राबवत पाणीपुरवठ्यासाठी जवळपास १८ कोटींची तर बांधकाम विभागामार्फत रस्ते व गटारीची जवळपास १७ कोटींची कामे पूर्ण केली आहेत.
महसुल वाढीसाठी जीपीएस प्रणालीचा अवलंब करून सर्व्हेकरून २ हजार ८०० घरे वाढली. वाढीव घरांच्या घरपट्टीमुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात ७० लाख रुपयांची वाढ झाली. शहरात अस्ताव्यस्त वाढलेल्या विकासनगर, मटन मार्केट परिसर, नायर झोपडपट्टी अशा झोपडपट्यांचे पुर्नवसन केले. ७०२ झोपड्यांतील सुमारे ३,५०० नागरीकांना रस्ते, दिवाबत्ती, गटार, वीज व पाणी अशा मुलभूत सुविधा पुरवल्या. त्यासाठी ८० लाख रूपये खर्च करण्यात आला. ४० लाख रूपये खर्च करून ग्रामपंचायतीतील जुन्या व महत्वाच्या कागदपत्रांचे स्कॅनिंग व संगणकीकरण करण्यात आले. त्यामुळे नागरीकांना एका क्लिकवरती आपली कागदपत्रे मिळणे सोपे झाले. जि. प. सदस्या शितलदेवी मोहिते-पाटील यांच्या फंडातून आणि १४ व्या वित्तआयोग फंडातून वॉर्ड क्र. ३, ४ व ५ तसेच महर्षि कॉलनी, आंबेडकर वसाहत परिसरात जी आय पाईपद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. यासाठी १ कोटी ५१ लाख रूपये खर्च झाला. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून अकलूज करीता विस्तारीत पाणीपुरवठा योजना अंतर्गत विझोरी तलाव ते अकलूज मधील सर्व पाणी टाक्यापर्यंतच्या पाईपलाईनसाठी १६ कोटी रूपये खर्च करण्यात आला.
गावातील जि. प. शाळांसाठी ई-लर्निंग क्लाससाठी साहित्य पुरवले. तर इतर शालेय साहित्य, क्रीडा साहित्य व खेळणी वाटप करण्यात आली. ४३ अंगणवाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टर सुविधा, बांधकाम व दुरूस्तीकामी १ कोटी २१ लाख ५८ हजार ७४३ रूपये खर्च करण्यात आले. गावातील नागरीकांची देशप्रेमाची भावना जागृत रहावी याकरीता विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल येथे १३ लाख ५ हजार रूपये खर्च करून ग्रामपंचायत स्तरावरील सर्वात मोठा १०५ फुट उंचीवर ३० बाय २० फुटाचा तिरंगा झेंडा फडकवण्यात आला. व क्रीडा संकुलाचे प्रवेशद्वार आणि अंतर्गत सिमेंट रस्त्यांसाठी ६७ लाख ५० हजार रूपये खर्च करण्यात आला. सन २०१४-१५ ते २०१९-२० या ५ वर्षाच्या कालावधीमध्ये गावात २८.६ किमीचे अंतर्गत रस्ते, ४.४ किमी गटार यासाठी अंदाजे १६ कोटी २६ लाख ६५ हजार ७१४ रूपये तर दिवाबत्तीसाठी १ कोटी ३९ लाख रूपयांचा खर्च करण्यात आला. अशाप्रकारे मागील ५ वर्षात ३९ कोटी ६७ लाख २४ हजार ४५७ रूपयांची विकास कामे करून शिवतेजसिंह यांनी आपल्या सरपंच पदाची कारकिर्द यादगार बनवली आहे.
सरपंच पदावर असतानाही शिवतेजसिंह यांनी ग्रामपंचायतींना अपुरा निधी येत असल्याने अकलूज गावचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर झाले पाहिजे यासाठी आग्रह धरला. घरातील ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयातील संबंधित मंत्री व अधिकार्यांचे उंबरठे झिजवले. नगरपरिषदेची मंजुरी अंतीम टप्प्यात आली असताना त्यात राजकारण आल्याने शेवटी शिवतेजसिंह यांनी गावकर्यांना सोबत घेऊन उपोषणाचा मार्ग निवडला. व तब्बल ४३ दिवस अकलूजच्या प्रांतअधिकारी कार्यालयासमोर अख्ख्या अकलूजकरांनी साखळी पध्दतीने उपोषण केले. त्यामुळे सरकारला गावकर्यांच्या मागणीसाठी झुकावे लागले व अखेर अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाले.
नगरपरिषद करत असतानाच शिवतेजसिंह यांनी गावकर्यांच्या हिताच्या अनेक योजनांची अभ्यासपूर्ण मांडणी करून ठेवली आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे विझोरीच्या पाणी साठवण तलावाची रूंदी वाढवून त्याचे खोलीकरण व अस्तरीकरण करणे तसेच त्यामध्ये ६० दिवस पाणी साठवून ठेवण्याची क्षमता राहणार आहे. तसेच ७७ मैल येथून थेट तळ्यात पाणी आणण्याची योजना तयार करण्यात आली आहे. अंडरग्राऊंड गटर, अंडरग्राऊंड वायरींग करून गावातील स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठीही त्यांचे प्रयत्न चालू केले आहेत. सांडपाणी व्यवस्थापन योजना, घनकचरा व्यवस्थापन, गावकर्यांना २४ तास पाण्याची उपलब्धता करण्याची योजना, गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात घरकुल बांधून देण्याची योजना, गावातील चौकांचे सुशोभिकरण, गावाचा रोल मॉडेल ठरवणाऱ्या विविध वैशिष्ठ्यपूर्ण योजना राबवण्याचे नियोजन व त्यांचे डीपीआर तयार करण्याचे कामही शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी करून घेतले आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे राज्यात भाजपाची सत्ता असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नातून वरील नियोजित कामांना निधी उपलब्ध होण्यासाठी शिवतेजसिंह मोहिते पाटील विशेष प्रयत्न करतील यात शंका नाही. त्यामुळे आता नगरपरिषदेच्या माध्यमातून गावाच्या विकासात भर टाकण्यासाठी शिवतेजसिंह यांनी पुढाकार घेऊन पुन्हा एकदा नेतृत्व करावे हिच समस्त गावकर्यांची इच्छा आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Very informative! Your insights are highly valuable. For additional details, check out: LEARN MORE. What are everyone’s thoughts?