सदाशिवनगर ग्रामपंचायत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी सज्ज…
प्लास्टिक कचरा संकलन केंद्राची उभारणी करून प्लास्टिकमुक्त वारी करण्याचा सदाशिवनगर ग्रामपंचायतचा संकल्प…
सदाशिवनगर ( बारामती झटका )
कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा माळशिरस तालुक्यात 4 जुलै रोजी येऊन नातेपुते मुक्कामी असतो. दि. 5 जुलै रोजी सकाळची न्याहारी मांडवे पूल येथे होऊन पालखी दुपारी सदाशिवनगर येथे येऊन पुरंदावडे येथील रिंगण सोहळ्यास जात असते.
सदाशिवनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सरपंच आशाताई नागनाथ ओवाळ, ग्रामपंचायत सदस्य विष्णुपंत भोंगळे, दादासो पालवे यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या नियोजनामध्ये कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी प्रशांत रुपनवर व ग्रामपंचायतचे कर्मचारी प्रसाद भोसले, आकाश, धनंजय, प्रमोद दळवी यांनी ग्रामपंचायत हद्दीमध्ये स्वच्छता, धुर फवारणी, क्लोरोनेशन पाणी, वृक्ष लागवड, वारकऱ्यांसाठी विश्रांती गृह, महिलांसाठी सुरक्षा कक्ष उभारला आहे. कोविड रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष केला आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाची उभारणी केलेली आहे. ठिकठिकाणी प्लास्टिक कचरा संकलन केंद्राची उभारणी करून प्लास्टिकमुक्त वारी करण्याचा सदाशिवनगर ग्रामपंचायतचा संकल्प आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या व भाविक भक्तांच्या स्वागतासाठी सदाशिवनगर ग्रामपंचायत सर्व सुख सुविधांनी सज्ज झालेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Fantastic insights! Your perspective is very refreshing. For more details on this topic, visit: EXPLORE FURTHER. What do others think?