सदाशिवनगर येथील विठ्ठल दादा भोसले यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्ष दत्ता भोसले यांचे बंधू होते…
सदाशिवनगर ( बारामती झटका )
सदाशिवनगर ता. माळशिरस येथील विठ्ठल दादा भोसले यांचे अल्पशा आजाराने दि. 15 एप्रिल 2023 रोजी दुःखद निधन झालेले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्ष दत्ताभाऊ भोसले यांचे बंधू होते. त्यांच्या पश्चात मातोश्री आशाबाई, पत्नी पल्लवी, आदित्य व समीक्षा अशी दोन मुले, बंधू दत्ताभाऊ, भावजय सुनिता, पुतणे श्रीराम आणि दर्शन, बहिण जयश्री शिंदे असा परिवार आहे. त्यांच्यावर सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. रक्षा विसर्जन (तिसऱ्याचा कार्यक्रम) दि. 17 एप्रिल 2023 रोजी सकाळी सात वाजता होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng