Uncategorizedताज्या बातम्या

सदाशिवनगर येथील सुप्रसिद्ध व्यापारी जंबुकुमार दोशी यांचे नातू चि. संयम याचे रत्नत्रयचे तीन उपवास पूर्ण झाले.

जैन धर्मातील उपवास आणि हिंदू व मुस्लिम धर्मातील उपवासामध्ये फरक आहे.

सदाशिवनगर ( बारामती झटका )

जैन धर्मातील पर्युषण पर्व हे आत्मशुद्धीचे महापर्व असते. या कालावधीत जैन बांधव उपवास करीत असतात. जैन धर्मातील उपवास आणि हिंदू व मुस्लिम धर्मातील उपवासामध्ये फरक आहे. सदाशिवनगर येथील सुप्रसिद्ध व्यापारी जंबुकुमार प्रेमचंद दोशी यांचे नातू चिरंजीव संयम प्रज्योत दोशी यांनी रत्नत्रयचे तीन उपवास पूर्ण केलेले आहे.

पर्युषण पर्व हे सत्य, अहिंसा आणि प्रेमाचे प्रतीक आहे या पर्वाचा समारोप क्षमावलीने होतो. पर्युषण पर्व जैन धर्मियांचे पावन पर्व आहे, क्षमा महान आहे, उदारतेची पराकाष्ठा आहे, वीरांचे आभूषण आहे, सगळ्यांच्या कल्याणाची वाहक आहे, मैत्रीचा मंगल हुंकार आहे, मानवतेची परम सीमा आहे, क्षमा अमर आहे. अशा पवित्र पर्युषण पर्व काळात जैन धर्मातील लहान मोठे बांधव रत्नत्रयचे उपवास करीत असतात.

जैन धर्मातील उपवासाच्या वेळी अन्न व पाणी ग्रहण केले जात नाही. निरंकार उपवास केले जातात. मुस्लिम धर्मामध्ये पवित्र रमजानच्या महिन्यात एक महिना मुस्लिम बांधव उपवास करीत असतात. सदरच्या उपवासामध्ये दिवसभर काहीही खात नाहीत. मात्र, रात्रीच्या वेळी सूर्योदयापर्यंत अन्न व पाणी सेवन केले जाते. हिंदू धर्मामध्ये आदिमाया शक्ती शारदीय नवरात्र उत्सवाच्या कालावधीतील व हिंदू धर्मातील अनेक उपवास केले जातात. मात्र उपवासाचे पदार्थ, फळे, पाणी सेवन केले जाते. त्यामुळे जैन धर्मातील उपवास आणि हिंदू व मुस्लिम धर्मातील उपवासामध्ये फरक आहे.

सदाशिवनगर येथील सुप्रसिद्ध व्यापारी सौ. त्रिशला व श्री. जंबुकुमार प्रेमचंद दोशी यांना दोन मुले प्रशांत आणि प्रज्योत आहेत. सौ. प्राजक्ता व श्री. प्रशांत यांना सिमरन व आर्यन दोन अपत्य आहेत. सौ. प्रियंका व श्री. प्रज्योत यांना साहिल व संयम अशी दोन अपत्य आहेत.

कोरोना कालावधीत गेल्या दोन वर्षांमध्ये कु. सिमरन व चि.आर्यन प्रशांत दोशी यांनी पंचमेरु पाच दिवसाचे उपवास केलेले होते. सध्या चिरंजीव संयम प्रज्योत दोशी यांनी रत्नत्रयचे तीन उपवास केलेले आहेत. शनिवारी दि. 10/09/2022 रोजी 7.30 वाजता चंद्र प्रभू दिगंबर जैन मंदिर नातेपुते येथे पालखीचा कार्यक्रम होऊन 11 वाजता विधान कार्यक्रम व पूजेचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button