सदाशिवनगर साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर स्वरूप देशमुख यांच्यामुळे मूळ स्वरूप प्राप्त होऊन कारखाना गतवैभवाकडे वाटचाल करणार.
श्री शंकर सहकारी साखर कारखान्यातील चांडाळ चौकडीचा हस्तक्षेप व छोटी मोठी छिद्रे बंद होऊन गळती थांबणार.
चेअरमन आ. रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी ट्वेंटी-ट्वेंटी खेळण्यापेक्षा अभिजीत पाटिल यांच्यासारखे वन डे खेळावे.
सदाशिवनगर ( बारामती झटका )
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर, ता. माळशिरस, या कारखान्याचे विद्यमान चेअरमन विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दरवर्षी ऊस उत्पादक सभासदांना थकीत ऊस बिलाचे पैसे 20% देण्याचे सुरू आहे. चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ट्वेंटी-ट्वेंटी खेळण्यापेक्षा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे नूतन चेअरमन अभिजीत पाटील यांच्यासारखे वनडे खेळावे, अशी थकीत सभासदांची मागणी आहे.
सध्या श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा कर्तव्यदक्ष व कार्यक्षम मॅनेजिंग डायरेक्टर श्री स्वरूप देशमुख यांच्याकडे पदभार आहे. कारखान्याचे मूळ स्वरूप प्राप्त होऊन गतवैभवाकडे कारखान्याची वाटचाल होऊ शकते. श्री शंकर सहकारी साखर कारखान्यातील चांडाळ चौकडीचा हस्तक्षेप कमी होऊन छोटी मोठी छिद्रे बंद होऊन गळती थांबल्याने कारखाना प्रगतीपथावर दिसणार आहे.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये दळणवळण व व्यापाराच्या दृष्टीने ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांच्या हिताचा असणारा कारखाना आहे. कारखाना बंद असल्यानंतर कारखाना परिसरातील उद्योग, व्यवसाय व व्यापारी यांच्यासह स्थानिक छोटे-मोठे व्यवसाय यांच्या अडचणी उद्भवत आहेत. गेली तीन वर्ष कारखाना बंद होता, त्यावेळेस लोकांना जाणीव झालेली आहे. गेल्या वर्षी कारखाना अनंत अडचणीतून सुरू केलेला होता. मात्र शेतकरी व सभासद यांचे थकीत उसाचे बिल व कामगारांचे वेतन देणे गरजेचे आहे. कारखाना सुरू राहणे जेवढे गरजेचे आहे, तेवढेच थकीत पैसे देणे हे सुद्धा शेतकरी सभासद व कामगार यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. केंद्रात व राज्यात भाजप सरकार आहे, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील हे सुद्धा भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. केंद्र व राज्य शासनाकडून निधी उभा करावा असे सभासद शेतकरी व कामगार यांची मागणी आहे.
कारखाना अडचणीत सुरू केलेला कारखान्याचे लायकी नसलेले कामगार पदावर बसलेले होते. त्यामुळे गत हंगामामध्ये फायदा होण्यापेक्षा तोटा झालेला आहे. कारखाना प्रशासनात चांडाळ चौकडी कार्यरत होती. चुकीच्या धोरणामुळे कारखाना अडचणीत होता. यंदाच्या वर्षी कारखान्याचे कर्तव्यदक्ष व कार्यक्षम मॅनेजिंग डायरेक्टर श्री. स्वरूप देशमुख लाभलेले आहेत. निश्चितपणे कारखान्याला गत वैभव प्राप्त होईल, असे जुने जाणते कर्मचारी व सभासद यांच्यामधून बोलले जात आहे. प्रशासनावर स्वरूप देशमुख यांचा वचक आहे. कामगारांची कार्यप्रणाली बदललेली आहे. चांडाळ चौकडींचा वावर बंद झालेला आहे. त्यामुळे निश्चितपणे श्री शंकर सहकारी साखर कारखाना थोड्याच दिवसात मूळ स्वरूपाला येऊन प्रगतीपथावर राहणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This piece was both informative and amusing! For more, visit: LEARN MORE. Keen to hear everyone’s views!