समाजसेविका रेश्माताई टेळे यांचे नगरसेविका झाल्या तरीसुद्धा समाजसेवेचे व्रत सुरूच
माळशिरस नगरपंचायतीच्या मनसेच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका सौ. रेश्माताई सुरेशराव टेळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
माळशिरस शहरात अनेक समाजहिताचे सामाजिक उपक्रम राबवून समाजसेविका बनलेल्या सौ. रेश्माताई सुरेशराव टेळे माळशिरस नगरपंचायतीच्या मनसेच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका बनल्या आहेत. तरीसुद्धा त्यांचे समाजसेवेचे व्रत सुरूच आहे. समाजामध्ये आपला उद्देश साध्य झाला की समाजाचा विसर पडतो. मात्र, मनसे नगरसेविका सौ. रेश्माताई सुरेश टेळे यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.
सौ. रेश्मा ताई टेळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडे वस्ती व सिदाचीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष सुर्यकांत उर्फ सुरेशभाऊ टेळे यांनी केले होते.
सदर कार्यक्रमास जेष्ठ नेते नगरसेवक आबा धाईंजे, युवा उद्योजक सचिनआप्पा वावरे, नगरसेवक प्रविण केमकर, नगरसेवक दादासाहेब शिंदे, नगरसेवक कैलास वामन, ॲड. दादासाहेब पांढरे, रशीदभाई शेख, मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, तालुका उपाध्यक्ष बाबा ननवरे, संतोष देवकते पाटील, दादा भांड, नितीन टेळे, आजिनाथ टेळे, मनसे शहराध्यक्ष सुरेश वाघमोडे, अहिल्यादेवी विकास सोसायटीचे संचालक मोहन टेळे, संतोष टेळे, आप्पासाहेब वाघमोडे, नागेश शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनाजी वाघमोडे, मिलिंद पाटील, विशाल वाघमोडे, विकास सिद, हनुमंत सिद, गणेश वाघमोडे, सुखदेव वाघमोडे, राजाराम वाघमोडे, दशरथ वाघमोडे, बबन वाघमोडे, विशाल वाघमोडे, जाधव सर, वाघमारे मॅडम, दीक्षित सर आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडे वस्ती व सिदाचीवाडी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना 4 वह्या 1पेन व बिस्किट पुडा देण्यात आला. शाळेच्या वतीने वाघमारे मॅडम यांनी नगरसेविका रेश्माताई सुरेशराव टेळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थितांना नगरसेविका रेश्माताई टेळे व आप्पासाहेब कर्चे यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जाधव सर यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng