सरकारने कांदा उत्पादकांची घोर निराशा केली – कुबेर जाधव
नाशिक ( बारामती झटका)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्रजी फडणीस यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प आज सादर केला. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थीक संकटात सापडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काही ठोस दिलासादायक घोषणा होतील, अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होती. परंतु आजच्या अर्थसंकल्पात कांदा उत्पादकांसाठी अनुदानासारखा कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे कांदा उत्पादकांची घोर निराशा झाली आहे.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्यावतीने कांदा उत्पादकांसाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे. परंतु याबाबत कोणतीही दखल घेण्यात आली नाही. मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर भावांतर योजनेअंतर्गत कांदा खरेदी करून फरकाची रक्कम थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे संदर्भात या अर्थसंकल्पात घोषणा होईल, अशी अपेक्षा होती, परंतु तसं काहीही झाले नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा अर्थ संकल्प निराशाजनकच ठरला आहे. – कुबेर जाधव, संपर्क प्रमुख, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng