Uncategorizedकृषिवार्ताताज्या बातम्याराजकारण

सरपंच हनुमंतराव टेळे यांचा राजकारण हा व्यवसाय नाही, शेती व्यवसाय करून केली आर्थिक प्रगती.

मांडवे गावच्या विकासासाठी कर्तव्यदक्ष सरपंच मात्र, शेतात फळबागेच्या उत्पन्नासाठी डॉक्टर आहेत.

सदाशिवनगर ( बारामती झटका )

मांडवे ता. माळशिरस गावचे कर्तव्यदक्ष विद्यमान सरपंच हणमंतराव भिमराव टेळे यांचा राजकारण हा व्यवसाय नाही. त्यांनी वडीलोपार्जीत शेती व्यवसाय करून आर्थिक प्रगती केलेली आहे. ते मांडवे गावात विकासासाठी सरपंच आहेत मात्र, शेतात फळबागेच्या उत्पन्नासाठी डॉक्टर आहेत.

मांडवे गावातील मारूती टेळे यांना पाच मुले आहेत. त्यापैकी सौ. अंजना व श्री. भिमराव मारूती टेळे यांचे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे. त्यांना हणमंतराव एकुलता एक मुलगा आहे. पुर्वी पासून पारंपरिक पद्धतीने शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह व आर्थिक प्रगती केलेली आहे. घरामध्ये सजाबाई मारूती टेळे ग्रामपंचायत सदस्य होत्या. त्यानंतर सजाबाई यांचा नातू हणमंतराव ग्रामपंचायत सदस्य चिठ्ठीवर निवडून येवून बिनविरोध सरपंच झालेले आहे. टेळे परिवारातील सरपंच होण्याचा बहुमान हनुमंतराव टेळे यांनी मिळवला आहे. हनुमंतराव यांचा साधा सरळ स्वभाव, सहकार्याची भावना असून ते सर्वांमध्ये मिळून मिसळून राहतात. काळ्या मातीतून घाम गाळून मोती पिकविणारे आधुनिक टेकनिक वापरून शेती व्यवसाय करून आर्थिक प्रगती केलेली आहे.

गोरडवाडी येथील बंकट हुलगे यांची कन्या उज्वला याच्याशी विवाह झालेला आहे. त्यांना चि. विजय एकुलता एक मुलगा आहे. हनुमंतराव दहावी शिकले आहेत. मात्र फळबागेत पीएचडी डॉक्टर पदवी असल्यासारखे आधुनिक टेक्नॉलॉजीने शेती व्यवसाय करीत आहेत. ते नवीन शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत असतात. फळबागेत डाळींब व सिताफळ उत्पादन घेण्याचा त्यांचा हातकंडा आहे. त्यांनी फळबागेतून आपली स्वतःची आर्थिक प्रगती व मित्रपरिवार नातेवाईक यांना सुध्दा मार्गदर्शन करून सहकार्य केलेले आहे. सरपंच झाले तरीसुद्धा अजून शेतकऱ्यांना लागवड, फवारणी, मटेरियल, पाणी वापर करण्याचे मार्गदर्शन सुरूच आहे.

हनुमंतराव टेळे यांनी पंधरा वर्षांपूर्वी डाळींब बाग लावलेली होती. बागेची परिपूर्ण माहिती असल्याने बागेतील डाळींबाचा आकार, वजन व कलर यामुळे ग्राहकांना डाळींब फळ आकर्षित करीत होते. डाळींब खरेदीसाठी व्यापार्यांची चढाओढ लागल असत. डाळींब बागेबरोबर गेल्या नऊ वर्षांपूर्वी बार्शी येथील कसपटे नर्सरी मधून गोल्डन सुपर सिताफळ लागवड दिड एकरात केलेली आहे. साधारण लागवडी पासून चार वर्षांत फळांचा भार सुरू होतो. यंदाचा पाचवा भार सुरू आहे. जुन महिन्यात भार धरला जातो, सहा महिन्यांत फळ परिपक्व होत असते. तणनाशक मारून वेळच्या वेळी फवारणी करावी लागते. सिताफळ फळांचा भार लकडलेला आहे.

दहा टनाच्या आसपास उत्पादन निघून खर्च वजा जाता आठ ते नऊ लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. ऊस पिकापेक्षा फळबागेत उत्पन्न जास्त मिळते. शेतकऱ्यांनी कमी पाण्यात जास्त उत्पन्न घेण्यासाठी फळबागेकडे वळणे गरजेचे आहे. परंतु हणमंतराव सारख्या शेतीतील डॉक्टर, तज्ञ लोकांकडून सल्ला घ्यावा.

हणमंतराव गावचे सरपंच झाले तरीसुद्धा शेतीशी नाळ जोडलेली आहे, तुटून दिलेली नाही. गावगाडा पाहून शेतीला वेळ देत आहेत. त्यांनी सरपंचकीची हवा डोक्यात शिरू दिली नाही. नाहीतर समाजामध्ये आपण पाहतो, साधा सदस्य झाले तरी बावरत असतात.

मांडवे गावातील राजकारणातील बुजुर्ग व्यक्ती, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व माजी सरपंच असणारे जयवंततात्या पालवे, बबनबापू पालवे व तानाजीआबा पालवे यांचा आदर्श घेऊन सरपंच हनुमंतराव टेळे यांचा ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे.

माळशिरस तालुक्यात क्षेत्रफळात सर्वात मोठी असणारी ग्रामपंचायत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी महामार्गावरील मांडवे गाव आहे. पालखीच्या प्रवासाच्या वेळी सकाळची न्याहारी गावच्या लगत ओढ्यावर होत असते. अशा सुसंस्कृत गावच्या सरपंच पदाची धुरा हनुमंतराव टेळे यशस्वीपणे सांभाळून उत्कृष्ट व आदर्श शेती करीत आहेत. त्यांचा आदर्श समाजातील राजकारणी मंडळींनी घ्यावा अशा पद्धतीचा आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button