Uncategorized

सर्वच पालख्यांच्या मार्गावरील गावांना निधी देण्याबाबत वरीष्ठांकडे पाठपुरावा करण्याच्या आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रांताधिकाऱ्यांना सूचना,

विविध कामांचा घेतला आढावा

अकलूज (बारामती झटका)

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी माळशिरस तालुक्यातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज या दोन प्रमुख पालख्यांबरोबरच इतर छोट्या- मोठ्या पालख्याही जात असतात. त्या मार्गावरील गावांनाही वारकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची तरतूद करून द्यावी व याबाबत वरीष्ठांकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिल्या.

आ. रणजितसिंह मोहिते पाटील व आ. राम सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उदय सभागृहात आयुष्यमान भारत कार्ड आढावा, जनजीवन मिशन आढावा, आषाढी वारी पालखी सोहळा नियोजन बैठक व पाणीपुरवठा टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस माजी पंचायत समिती उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, प्रांतअधिकारी नामदेव टिळेकर, तहसिलदार तुषार देशमुख, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, आयुष्यमान भारत कार्ड जिल्हा समन्वयक डॉ. भोपळे, माळशिरस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांच्यासह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सदर बैठकीमध्ये प्रारंभी आयुष्यमान भारत कार्डबाबत आढावा घेऊन कार्डपासून कोणी वंचित राहु नये यासाठी 100 टक्के नागरीकांना कार्ड काढून देण्याच्या सूचना आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पालखी सोहळ्याचा आढावा घेताना पालखी मार्गावरील गावांतील रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता इ. महत्वपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करून वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याबाबतही आ. रणजितसिंह यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

दोन्ही पालखी महामार्गावरील जमिन अधिग्रहणाबाबत प्रांतअधिकाऱ्यांनी येत्या आठवडाभरात स्वतंत्र बैठक लावून संबंधितांचे प्रश्न मार्गी लावण्याबाबतच्या सूचना दिल्या. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेल्या 87 कामांपैकी केवळ 7 कामे पूर्ण झाली असून 34 कामे प्रगती पथावर तर 19 कामे निविदा स्तरावर आहेत. यामध्ये 27 कामे मात्र अद्याप सुरूच झाली नसल्याने याबाबत संबंधित गावातील सरपंच, उपसरपंच व पुढाऱ्यांकडून याबाबतच्या अडचणी आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जाणून घेतल्या.

पाणीपुरवठा टंचाई आढावा घेत असताना शिंगोर्णी, बचेरी, गारवाड, मगरवाडी या चार गावातील नागरीकांनी दोन ते तीन महिन्यांपूर्वी पाण्याच्या टँकरबाबत मागणी करूनही उन्हाळा संपत आला तरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप टँकरची सोय केली नसल्याने नाराजी व्यक्त केली. याबाबत आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी संबंधित गावामध्ये तात्काळ टँकर सुरू करण्याबाबत पाठपुरावा करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांना दिले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button