सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवा प्राध्यापक शिवाजीराव सावंत
करमाळा (बारामती झटका)
शिवसेनेच्या शाखा ह्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व सर्व सामान्यांवरचा अन्याय दूर करण्यासाठी सर्व सदैव कार्यतत्पर राहिली पाहिजेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केले. मौजे देवळाली येथील युवा सेनेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, प्रमुख अनिल पाटील, शहरप्रमुख संजय आप्पा शीलवंत, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. युवा सेनेचे तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, देवळाली शाखाप्रमुख सुधीर आवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक शिवाजीराव सावंत म्हणाले की, ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे ध्येय-धोरण पुढे ठेवून आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहोत. आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याचे प्रश्नाचे सोडवले जात आहेत. सर्वसामान्य कुटुंबांचे नागरिकांचे अनेक छोटे छोटे प्रश्न असतात, हे प्रश्न सोडवण्यासाठी युवा सेनेच्या व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अशा लोकांच्या मदतीला धावून जाणे गरजेचे आहे. ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तेथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तुटून पडून सर्वसामान्यांच्या बाजूने उभा राहणे गरजेचे आहे.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, करमाळा तालुक्याच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील सर्व निवडणुका धनुष्यबान चिन्हावर लढवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे धनुष्यबाण चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांनी कटिबद्ध राहावे, असे आव्हान चिवटे यांनी केले.
बोलताना तालुकाप्रमुख राहुल कानगुडे म्हणाले की, तिच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील ११८ गावात युवा सेनेच्या शाखा उघडण्यात येणार असून तालुक्यातील युवा वर्ग मोठ्या संख्येने या संघटनेत सहभागी होत आहे. महेश चिवटे यांच्या धाडसी नेतृत्वामुळे करमाळा तालुक्यात शिवसेना मजबूत होत असल्याचे सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng