सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा बनला पडसाळी गावातील पहिला केंद्रीय रेल्वे अधिकारी

लऊळ (बारामती झटका)
परिश्रमाला जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाची जोड दिल्यास निश्चितच अपेक्षित फळ मिळते. परिस्थितीचा बाऊ न करता, आहे त्या परिस्थितीशी दोन हात करून यश कसे पदरात पाडता येईल, हा विचार करणारेसुद्धा बरेचजण आहेत. आपण ठरविलेले ध्येय गाठायचेच हीच खूणगाठ बांधून परिश्रम घेणाऱ्या शेतमजुराच्या मुलाला अखेर यश आले असून, गावातील पहिला केंद्रीय रेल्वे अधिकारी झाला व आई-वडिलांचे कष्टाचे फलीत केले आहे.
सुरज तानाजी मुटकुळे (रा. पडसाळी, ता. माढा) असे रेल्वे अधिकारी झालेल्या शेतकऱ्याच्या मुलाचे नाव आहे. वडील तानाजी मुटकुळे, भाऊ कल्याण मुटकुळे यांच्या प्रयत्नामुळे मी आज यशाचे शिकार गाठू शकलो आहे, असे सुरज यांनी सांगितले.

दौंड रेल्वे स्टेशनवरती एक जून पासून असिस्टंट स्टेशन मास्तर म्हणून नेमणूक झाली आहे.
त्यामुळे पडसाळी ग्रामस्थ आणि मित्रपरिवार यांच्याकडून कौतुक आणि अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng