Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी जयसिंह मोहिते पाटील तर, व्हाईस चेअरमन पदी शंकरराव माने देशमुख

अकलूज (बारामती झटका)

अकलूज ता. माळशिरस येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी पुनश्च जयसिंह मोहिते पाटील यांची निवड झाली असून व्हाईस चेअरमन पदासाठी ज्येष्ठ संचालक शंकरराव माने देशमुख यांना संधी देण्यात आली आहे.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतन संचालकांची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी तथा भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली. चेअरमन पदासाठी जयसिंह मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना सूचक म्हणून लक्ष्मण शंकर शिंदे तर, अनुमोदक म्हणून संग्रामसिंह अजितसिंह जागीरदार यांनी सह्या केल्या. व्हाईस चेअरमन पदासाठी शंकरराव रामचंद्र माने देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना सूचक म्हणून विजयकुमार नामदेव पवार यांनी तर अनुमोदक म्हणून रावसाहेब विठोबा मगर यांनी सह्या केल्या. प्रत्येकी एका जागेसाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी नागेश पाटील यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठीची निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

यावेळी कारखाना परिसरात हलक्यांचा कडकडाट व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या निवडीनंतर नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्यासह संचालक मंडळांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या कारखाना परिसरातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.

यावेळी संचालक तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, स्वरूपाराणी मोहिते पाटील, लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, संग्रामसिंह जहागीरदार, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षीरसागर, भीमराव काळे, अमरदीप काळकुटे, गोविंद पवार, कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले आदी उपस्थित होते. नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा यावेळी विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. जयसिंह मोहिते पाटील व शंकरराव माने देशमुख यांनी सहकार महर्षींचे दर्शन घेतले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button