अरण्यऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी पद्मश्री चित्तमपल्ली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली..
अक्कलकोट (बारामती झटका)
पद्मश्री अरण्यऋषी श्री. मारुतीराव भुजंगराव चित्तमपल्ली यांचे 18 जून 2025 रोजी सायं 7.50 वाजता वयाच्या 94 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले होते. आज अक्कलकोट रोडवरील सूत मिल हेरिटेज मनिधारी एम्पायर सोसायटी येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्यांच्यावर रूपा भवानी मंदिराजवळील हिंदू स्मशान भूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस विभागाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून श्री. चित्तमपल्ली यांना मानवंदना देण्यात आली.

यावेळी राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम. राजकुमार व उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी श्री. चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले व दर्शन घेतले.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सामाजिक वनीकरण चे अजित शिंदे, मनीषा पाटील यांच्यासह अन्य मान्यवर तसेच त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, साहित्यिक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



