साखर कारखानदारांनी टांगले मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तारले…
गतवर्षीपेक्षा दुप्पट नुकसान भरपाई मिळाल्यामुळे शेतकरी आनंदात !!!
करमाळा (बारामती झटका)
करमाळा तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांचे अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले होते. पण या नुकसानीचे तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्या पद्धतीने पंचनामे होऊन आज करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ५५ कोटी रुपये जमा झाले आहेत. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला तालुक्यातील मकाई साखर कारखाना, भैरवनाथ साखर कारखाना व कमलाई साखर कारखाना या तिन्ही साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकाचे गेली दोन महिन्याचे पहिले बिल सुद्धा दिलेले नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. यामुळे कारखानदारांनी टांगले मात्र, मुख्यमंत्र्यांनी तारले, अशी भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
यावर्षी नुकसान भरपाई देताना शिंदे-फडणवीस सरकारने एक हेक्टरची मर्यादा दोन हेक्टरपर्यंत वाढवली. शिवाय नुकसान भरपाईची रक्कम दुपटीने वाढवली. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई समाधानकारक मिळाली आहे. खरीप हंगामात पिके घेणारे शेतकरी जिराईत भागातील आहेत. रब्बी हंगामात सुद्धा अवकाळी पावसामुळे हरभरा, गव्हाचे हवे तसे उत्पन्न आले नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता मात्र, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळाला आहे. ही रक्कम डायरेक्ट मनी ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी तत्त्वावर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यामुळे या निधी वाटपात वशिलेबाजी टाळली गेली आहे. दरम्तायानत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे तहसीलदार समीर माने व त्यांच्या सर्व टीमचे शिवसेनेने पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला
ऊस कारखानदारांनी ऊस गाळपात गेल्यानंतर १४ दिवसाच्या आत एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, असा कायदा असताना तीन कारखान्यांनी जवळपास शेतकऱ्यांचे १३० कोटी रुपये अडकून ठेवले आहेत. प्रमाणे या कारखान्यावर साखर आयुक्तांनी कारवाई करणे गरजेचे असताना साखर आयुक्त सुद्धा तोंडाला चिकटपट्टी लावून बसले आहेत
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रारी करूनसुद्धा त्याची दखल घेतली गेलेली नाही.