नागपूरच हिवाळी अधिवेशन संपत आलं तरी जॅकेटचा ऑर्डर देणारा गायब टेन्शनमध्ये टेलर…

सभागृहात बोटवर करून बोलताना जॅकेट हलले न पाहिजे असे म्हणत होते आणि आता कुठे तोंड वर करून गेलेत, जॅकेट न्यायला सुद्धा येईनात…..
मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे सरकार स्थापन होऊन पहिले हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. अधिवेशन संपत आलं तरीसुद्धा जॅकेटचे ऑर्डर देणारा गायक टेन्शनमध्ये टेलर आलेला आहे. जॅकेटची ऑर्डर देताना सभागृहात बोट वर करून बोलताना जॅकेट हलले न पाहिजे असे म्हणत होते आणि आता कुठे तोंड वर करून गेलेत, जॅकेट न्यायला सुद्धा येईनात अशी आशाळभूत प्रतिक्रिया टेलरने व्यक्त केलेली आहे.
लोकसभेच्या निवडणुक निकालानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुक निकालापूर्वी वेगळीच हवा होती. त्यामुळे अनेक जणांनी मंत्रिपदाची स्वप्ने उराशी बाळगलेली होती. त्यामुळे शपथविधीला वेगळे जॅकेट अधिवेशनात दररोज वेगवेगळे कलरचे जॅकेट असावीत, अशी मनोमन इच्छा करून एका नेत्याने जॅकेटची ऑर्डर टेलर कडे दिलेली होती. ऑर्डर देत असताना सभागृहात बोट वर किंवा हात वर केल्यानंतर जॅकेट शर्टावरून किंवा नेहरू वरून हलले न पाहिजे, माप घेताना तंतोतंत घ्यावयास लावलेले होते. जॅकेटचे माप संपताच पीएनी गाडीतून फोन आणून दिला आणि सांगितले, साहेबांनी अर्जंट बंगल्यावर बोलविलेले आहे. त्यामुळे घाई गडबडीत ॲडवान्स व मोबाईल नंबर घेण्याचे राहून गेले. दिसायला मोठे घरचे वाटत होते. त्यामुळे बिगर ॲडवांस घेता जॅकेट तयार केले आणि तसेच पडलेले आहेत. अशी हताश होऊन टेलर यांनी प्रतिक्रिया विशेष खास प्रतिनिधी यांच्याकडे बोलून दाखवलेली आहे. त्यामुळे बातमी वाचून ज्यांची जॉकेट आहेत त्यांनी घेऊन जावे, असेही बारामती झटका वेब पोर्टल च्या २ कोटी ७५ लाख वाचकांच्या माध्यमातून जॉकेट ऑर्डर देणाऱ्या नेत्याला विनंती आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.