सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र यशवंतनगर यांची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.

संग्रामनगर (बारामती झटका) केदार लोहकरे यांजकडून
महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर, महाराष्ट्र शासन अंगिकृत जीवनोन्नती अभियान अंतर्गत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला, उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र यशवंतनगर आदर्श प्रभाग यांची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज माळीनगर येथील सौभाग्य मंगल कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सदर सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सोलापूर जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे, सहा. जिल्हा समन्वय अधिकारी माविम, सोलापूर, सतीश भारती, तालुका अभियान व्यवस्थापक रणजीत शेंडे, उमेश जाधव, तालुका उपजीविका सल्लागार म्हणून बँक ऑफ इंडियाचे अतुल टेळे, एस.बी.आय. बँकेचे रिजनल मॅनेजर श्रीकांत दाभाडे, एस.बी.आय.चे अक्षय खट्टे, बँक ऑफ इंडिया अकलूजचे शाखा अधिकारी नितीन काकडे, युवराज पाटील आयसीआयसीआय बँकेचे विनीत कुरनावळ, शुभांगी पवार व तनुजा पाटील व्यवस्थापक सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्र, अध्यक्ष कौसर शेख व लोक संचलीत साधन केंद्राच्या सर्व कार्यकारीणी सदस्या, सीआरपी केंद्राचे महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संस्थेने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांत केलेल्या कामाचे अहवाल प्रास्ताविक वाचन सीएमआरसी व्यवस्थापक तनुजा पाटील यांनी केले. सविता क्षीरसागर सीएमआरसी लेखापाल यांनी संस्थेचा आर्थिक अहवाल वाचन केले. रूक्साना शेख लेखापाल ग्रामसंघ यांनी सर्व ग्रामसंघाच्या आर्थिक बाबींचा सविस्तर अहवाल मांडला. तर जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे यांनी योजनांची माहिती विविध माध्यमातून मिळणारा निधी वापर उद्योगासाठी कसा करावा, याविषयी महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणा-या ग्रामसंघ, गट व उत्पादक गट, उत्कृष्ट लेझीम पथक यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा कौसर शेख यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिजवाना शेख व वैशाली कांबळे व सर्व सीआरपी यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी गावडे यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng