सासवड येथील दि सासवड माळी शिक्षण संस्थेच्या नवीन वस्तीगृहाचे भूमिपूजन
माळीनगर (बारामती झटका)
माळीनगर ता. माळशिरस येथील दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी, माळीनगर या शिक्षण संस्थेच्या नवीन वस्तीगृह इमारत बांधकाम जागेचा भूमिपूजन समारंभ सोमवारी माळीनगर येथे उत्साहात पार पडला. दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या दि मॉडेल हायस्कुल व प्राथमिक शाळा क्र. १ शेजारील जुन्या वस्तीगृहाच्या ठिकाणी सर्व सोयींनियुक्त अशा नवीन १९ रूम्स करिता सुरुवातीला ९६७२ स्क्वेअर फूट सुसज्ज असे बांधकाम करण्यात येणार असून संस्थेने २०० विद्यार्थ्यांचे निवासाचे उद्दिष्ट ठेवले आहे. या वस्तीगृहाच्या ठिकाणी किचन, डायनिंग हॉल, लायब्ररी तसेच जिम, व्हॉलीबॉलचे मैदान आदी सोयी असणार आहेत.
या नवीन वस्तीगृह इमारत बांधकाम जागेचे भूमिपूजन दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे होलटाईम डायरेक्टर सतीश गिरमे व महात्मा फुले पतसंस्थेचे व्हा. चेअरमन महादेवराव एकतपुरे यांच्याहस्ते विधिवत पूजन करून टिकाव व खोऱ्याने माती काढून उत्साहात करण्यात आले.
यावेळी दि सासवड माळी साखर कारखान्याचे व एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गिरमे, व्हा. चेअरमन नितीन इनामके, सेक्रेटरी प्रकाश गिरमे, खजिनदार पृथ्वीराज भोंगळे, संचालक ॲड. सचिन बधे, अजय गिरमे, संचालिका लीनाताई गिरमे, ज्योतीताई लांडगे, विश्वस्त चंद्रकांत जगताप, साखर कारखान्याचे संचालक निळकंठ भोंगळे, शुगरकेन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे, संचालक सुरेश राऊत, मनीष रासकर, संचालिका विद्याताई गिरमे, म. फुले पतसंस्थेचे संचालक अंकुश फुले, ग्रा. पं. माजी उपसरपंच संग्राम भोसले, प्रशालेचे प्राचार्य प्रकाश चवरे, उपप्राचार्य कलाप्पा बीराजदार, पर्यवेक्षक रितेश पांढरे, प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका आशा सावंत, माजी प्राचार्य के. बी. कुलकर्णी, माजी शिक्षक सतीश साबडे, शिक्षक राजीव देवकर, जेष्ठ लिपिक सुधीर देवळालीकर, क्रीडा विभाग प्रमुख रणजित लोहार, वसंत आंबोडकर, रेक्टर सचिन हजारे, स्वप्नील नागटीळक, कॉन्ट्रॅक्टर सुनील शिंदे, अरुण चंदनशिवे आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कांबळे यांनी केले व आभार जॉइंट सेक्रेटरी प्रकाश चवरे यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng