आजी आजोबा म्हणजे मायेची सावली – पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड
अकलूज (बारामती झटका)
प्रत्येक घरामध्ये आजी-आजोबा असणे म्हणजे मायेची सावली असते. आजी आणि नातवंडे ही आपल्या कुटुंब संस्थेतील तीन पिढ्यांना सांभाळून ठेवणारा महत्त्वाचा धागा आहेत. हजयात्रेकरूंना शुभेच्छा देताना हजयात्रेकरूंनी आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या भारत मातेच्या समृद्धीसाठी, भरभराटीसाठी अल्हाकडे प्रार्थना करावी, असे आवाहन अकलूजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी केले.
ताहेरा फाउंडेशन अकलूज आयोजीत हाजयात्रेकरूंचा सत्कार व इयत्ता १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्यामध्ये ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबुबकरभाई तांबोळी यांनी ताहेरा फाउंडेशनने राबवलेल्या विविध उपक्रमाची माहिती सांगुन हजयात्रेकरूंना पवित्र मक्का-मदिना येथे गेल्यानंतर आपल्या भारत देशासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रास्ताविकातून केले.

हजयात्रेला जाणारे तौकीर मनियार, अहमदभाई बागवान, रज्जाकभाई बागवान, मुस्तफाभाई मुलाणी यांचा सत्कार व शुभेच्छा दिपरत्न गायकवाड व प्रगतशील शेतकरी बाळासाहेब पंधे यांच्याहस्ते हाजी रुमाल, टोपी व गुलाबपुष्प देवून करण्यात आला. महिला हजयात्रेकरू रूक्साना मनियार, शमशाद बागवान, रुक्साना बागवान, फरीदा जमादार यांचा सत्कार हाजानीमाॅ ताहेरा तांबोळी, हाजानीमाॅ दिलशाद तांबोळी, हाजानीमाॅ जुबेदा तांबोळी यांच्या हस्ते ओढणी व गुलाबपुष्प देवून करण्यात आला.
तसेच फेब्रुवारी २०२३ मधील बारावी परीक्षेत विशेष गुणवंत विद्यार्थी ईकरा शेख, अब्दाल शेख, असिफ मुजावर, उम्मेकश्यप शेख, सलीना मुलाणी, अल्फीजा मुल्ला, सायली बंडगर, सकिना मकानदार, श्रीराज केचे, सोफियानाज तांबोळी, सना तांबोळी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सॅक व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. अब्दाल शेख या विद्यार्थ्यांने सत्काराला उत्तर देताना आपण भारताचे चांगले नागरिक बनू आणि पुढेही चांगला अभ्यास करू, असे आश्वासन आपल्या मनोगतातून दिले.
सदर कार्यक्रमाला हाजी युसूफ तांबोळी, हाजी असलम तांबोळी, जाकीर तांबोळी, अब्बासभाई तांबोळी, मुक्तार कोरबू, भैय्या माढेकर, जावेद बागवान, जावेदबाबा तांबोळी, रफिक पठाण, शादाब तांबोळी, शाहिद तांबोळी, देवा शिंदे, दादा तांबोळी, गौस बागवान, अस्लम काझी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकील मुलाणी सर व इलाही बागवान सर यांनी केले. ताहेरा फाउंडेशनच्या या उपक्रमाबद्दल सत्कारमूर्तींनी समाधान व आनंद व्यक्त केला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng