वाघोली येथे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमाने साजरी
वाघोली (बारामती झटका)
वाघोली ता. माळशिरस येथे सालाबादप्रमाणे याहीवर्षी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. जयंतीच्या पूर्वसंध्येला ह. भ. प. सागर महाराज बोराटे सर नातेपुते यांचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर किर्तनावर कार्यक्रम झाला. या कीर्तन सोहळ्यास महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती. यावेळी ह. भ. प. बोराटे सर यांच्या कीर्तनानंतर सर्व उपस्थित शिवभक्तांना स्नेहभोजन देण्यात आले. जवळपास दीड हजाराच्या आसपास ग्रामस्थांनी आस्वाद घेतला.
दि. 14 मे रोजी छत्रपती संभाजी राजे यांचे पुतळ्यास अभिषेक घालून प्रतिमा पूजन करण्यात आले. सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. सदर शिबिरात 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदानासाठी गावातील सर्वच क्षेत्रातील रक्तदात्यांनी सहकार्य केले. दि 14 रोजी सायंकाळी 7.00ते 10.00 या वेळेत छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकची सुरवात अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रतिमा पुजनाने करण्यात आली. सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन समस्थ ग्रामस्थ वाघोली यांचे वतीने करण्यात आले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng