सोलापूर जिल्हा माळी महासंघ विधी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी ॲड. रेखाताई शाहू यादव यांची निवड

सोलापूर (बारामती झटका)
माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाशजी ठाकरे, प्रदेश अध्यक्ष अरुणजी तिखे, माळी महासंघ महाराष्ट्र राज्य किसान आघाडीचे प्रदेश अध्यक्ष शंकरराव वाघमारे यांच्याशी चर्चा करून माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर जांभळे सर यांच्याकडून ही निवड जाहीर करण्यात आली आहे.
पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे कार्यरत असणाऱ्या सौ. रेखाताई यादव या मुळच्या पुळुजवाडी ता. पंढरपूर, जि. सोलापूर येथील रहिवाशी आहेत. सुमारे दोन वर्षापासून त्या पंढरपूर कोर्टात प्रॅक्टिस करत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष अविनाशजी ठाकरे, प्रदेश अध्यक्ष अरुणजी तिखे, माळी महासंघ किसान आघाडीचे प्रदेश अध्यक्ष शंकरराव वाघमारे, प्रदेश सचिव चंद्रशेखर दरवडे, विश्वस्त भारत माळी, विभागीय महामंत्री रंगनाथजी नाळे, माळी महासंघचे पंढरपूर तालुका अध्यक्ष शाम गोडसे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश राऊत, माळी महासंघ माढा तालुका अध्यक्ष बालाजी राऊत, मोहोळ तालुका युवक अध्यक्ष सागर वाघमारे, संतोष माळी, पंढरपूर तालुका माळी महासंघ महिला आघाडी अध्यक्षा सौ. वंदना देवकर, माढा तालुका माळी महासंघ महिला आघाडी अध्यक्षा मनीषा भानवसे, उत्तर सोलापूर माळी महासंघ महिला आघाडी अध्यक्षा विजयाताई माळी, स्मिताताई जांभळे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng